मुंबई - आज राज्यात ३ हजार ५५८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहचला आहे. राज्यात आज ३४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५० हजार ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५४ हजार १७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा -'मुंबईसाठी दोन आयुक्त का नसावेत?' पालकमंत्री शेख यांचा भाजप नेत्यांना सवाल
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६५ टक्के
राज्यात आज २ हजार ३०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८ लाख ६३ हजार ७०२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६५ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३४ लाख १ हजार १७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ६९ हजार ११४ नमुने म्हणजेच १४.६९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ३४ हजार ८४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५४ हजार १७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कधी किती रुग्ण आढळून आले
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० हजार रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत कमी होत आहे.
हेही वाचा -राज्यात फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही : आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर