मुंबई - हिंगोली येथे आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar ) यांनी कृषि अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या बैठकीत जिल्हा कृषी अधिक्षकांना सर्वासमोर दमदाटी ( District Agriculture Superintendent ) केली. अशा प्रकारची घटना पाहता जबाबदार लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक ठिकाणी अशी धमकीवजा वक्तव्ये केल्याने अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण झाले असून यामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, तरी याबाबत ठोस निर्णय घ्यावा असे पत्रच अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना दिलं आहे. आज वर्षा शासकीय निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
विना अनुदानित शाळांचा प्रश्न सोडवावा -त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांच्या याद्या जाहीर करण्यासाठी सरकारने निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित करणेबाबत राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात आश्वासन दिले होते. या प्रश्नासंदर्भांत दिनांक १० ऑक्टोबर २०२२ पासून अनेक शिक्षक आझाद मैदान, मुंबई येथे अंदोलन करीत आहेत. विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे. तरी त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. दिवाळीच्या तोंडावर शिक्षकाचे आंदोलन असे योग्य नसल्याचे अजित पवार ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) म्हणाले आहेत.
अहमदनगर येथील बर्डे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी - वांदरकडा, खंदरमाळ ता.संगमनेर जि.अहमदनगर येथे विजेची तार पडून दिनांक ८ आक्टोबर २०२२ रोजी झालेल्या अपघातामध्ये बर्डे या एकाच कुटुंबातील ४ मुलांचा दुर्देवी मूत्यू झाला आहे. या अपघातामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ही सर्व मुले आदिवासी कुटुंबातील असून त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मी या कुटुंबाला प्रत्यक्ष भेट दिली आहे. या कुटुंबाला या दु:खातून सावरण्यासाठी शासनाकडून तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये व महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडून चार लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यांना ती अद्याप मिळालेली नाही. तरी या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी.
शिधावाटप त्वरित करण्यात यावा - राज्यातील गोरगरीब जनतेला दिवाळी गोड साजरी करता यावी यासाठी राज्य सरकारने शिधा वाटपाचा निर्णय घेतला आहे. मात्र दिवाळी तोंडावर आली असून, देखील अद्याप रेशन दुकानावर शेतात उपलब्ध नसल्याने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लाभ जनतेला घेता येत नाही. याबाबत देखील आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितला आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारचा -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला. ही गंभीर बाब असून राज्यातले सरकारी किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांना तसेच सामान्य नागरिकांना संरक्षण मिळाले पाहिजे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेचा आहे. भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी देखील आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितले.