मुंबई:पंतप्रधान नरेंद्रमोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा (Threatens to kill PM Modi) मेल एनआयएच्या मुंबई शाखे कडे (At the NIA branch in Mumbai) आला आहे. मोदींना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार असल्याचा उल्लेख मेल मध्ये असून त्यांना मारण्यासाठी 20 किलो आरडीएक्स तयार असल्याचे म्हणले आहे. धमकी देणाऱ्याने त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला एक ई-मेल आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचे २० गट सक्रिय झाल्याचे तसेच आरडीएक्सच्या साहाय्याने स्फोट घडवून मोदींचा घातपात करण्यात येईल, असे या मेलमध्ये म्हटले आहे. हल्ल्याची योजना तयार आहे. तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे म्हणले आहे. एनआयए कडून संबंधित मेलचा तपास सुरू आहे. तसेच गृहमंत्रालयाकडून इतर केंद्रीय तपास यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे.
काय म्हणले आहे मेल मधे : या संदर्भात केलेल्या ईमेल मधे त्याने म्हणले आहे की, माझ्याकडे 20 किलो पेक्षा जास्त आरडीएक्स आहेत आणि मी 20 मोठे हल्ला करण्याची योजना आखली आ. हे हल्ले सर्व 20 प्रमुख शहरांमध्ये करण्याचे नियोजन केले आहे. मला जमेल तितक्या लवकर मोदींना मारायचे आहे. त्यामुळे मी मोठे बाॅंबस्फोट करणार आहे. मोदींमुळे माझे जीवन नष्ट झाले आहे. मी आता कोणालाही सोडणार नाही. मी लाखो लोकांना मारणार आहे. मी त्यासाठी दहशतवाद्यांना भेटलो आहे. त्यांनी मला सहज आरडीएक्स उपलब्द करुन दिले आहे. मी सर्वत्र स्फोट करणार आहे. मला थांबवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर करा पण मी हल्ले करण्याचे पुर्ण नियोजन केले आहे.
अनेकदा धमक्या 18 जानेवारी 2022: गुप्तचर यंत्रणांना या वर्षी प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांना लक्ष्य करणार्या संभाव्य दहशतवादी योजनेबद्दल काही तपशील मिळाले होते. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, नऊ पानांच्या इंटेलिजन्स फीडने हे उघड केले होते की, पंतप्रधान मोदी आणि भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असलेले इतर मान्यवर धोक्यात होते.
04 जुन 2021: एका 22 वर्षीय व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर त्याला दिल्लीतील खजुरी खास परिसरातून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यावेळी सांगितले होते की, सलमान उर्फ अरमान या आरोपीने गुरुवारी मध्यरात्री फोन करून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.