मुंबई: खंडणीसाठी सोशल मीडियावर अपप्रचार करुन बदनामीसह धमकी दिल्याचा या तिघांवर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. वंशबहादूर मुन्नी जैस्वाल हे मेट्रो कॉन्ट्रक्टर असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत कांदिवली परिसरात राहतात. त्यांचा दीपक हा मित्र असून ते त्याला गेल्या काही वर्षांपासून ओळखतात. तो स्वत:ला मानव अधिकार आयोगाशी संबंधित असल्याचे सांगत होता. बारा वर्षांपूर्वी त्याने त्याची ओळख प्रमोदशी करून दिली होती. प्रमोद हा मानवाधिकार इमर्जन्सी सोशल हेल्पलाईन नावाच्या संस्थेचा महाराष्ट्र अध्यक्ष असून याच संस्थेत त्याचा मित्र सुनिल हादेखील काम करतो. सुनिलने तो पत्रकार असून त्याचे डिजिटल मिडीया नावाचे लोकल चॅनेल असल्याचे सांगितले होते.
कर भला तो हो बुरा: फिर्यादी वंशबहादूर यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी तिन्ही आरोपींना काही आर्थिक मदत घेतली होती. जून २०२२ रोजी प्रमोदने त्यांच्याकडे संस्थेसाठी तीन लाखांची मागणी केली होती; मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांनी ती मदत देण्यास नकार दिला होता. त्याचा या तिघांना राग होता. या तिघांनी त्यांना किमान ५० लाख रुपये मिळावे यासाठी फिर्यादी वंशबहादूर यांना ब्लॅकमेल करून धमकी दिली होती. यावेळी वंशबहादूर यांनी 9 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यांनी ५० लाखांची मागणी करुन त्यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या चॅनेलवर खोट्या बातम्या देऊन त्यांची बदनामी केली. ते व्हिडीओ अनेकांना व्हायरल केले.