मुंबई Threat To Mumbai Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 उडवून देण्याची धमकी दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धमकी देण्याऱ्यांनी ईमेल करुन स्फोट टाळण्यासाठी 1 मिलियन डॉलर बिटकॉईनमध्ये देण्याची मागणी केली. त्यामुळे मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ टर्मिनल 2 उडवून देण्याची धमकी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं टर्मिनल 2 उडवून देण्याचा ईमेल विमानतळाच्या मेलवर आली. गुरुवारी सकाळी 11 वाजता आलेल्या या ईमेलनं मोठी खळबळ उडाली. हा ईमेल मुंबई विमानतळाच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये पाठवण्यात आला होता. त्यामुळे विमानतळ प्रशासनाची एकच धावपळ उडाली. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
स्फोट टाळण्यासाठी मागितले 1 मिलियन डॉलर :धमकी देणाऱ्यानं मुंबई विमानतळ प्रशासनाकडं 1 मिलियन युएसडी डॉलर बिटकॉईनमध्ये मागितले आहेत. त्यामुळे विमानतळ प्रशासनानं याबाबत तत्काळ गंभीर दखल घेऊन पोलिसांना माहिती दिली. हा ईमेल quaidacasrol@gmail.com या ईमेल आयडीवरुन मुंबई विमानतळाच्या ईमेलवर करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. धमकी देणाऱ्यानं 48 तासाच्या आत 1 मिलियन डॉलर देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे स्फोट टाळायचा असेल, तर हे पैसे लगेच पाठवा, त्याबाबत 24 तासात दुसरा ईमेल करण्यात येईल, असंही धमकीच्या मेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला धमकीचा ईमेल आल्यानं प्रशासनानं सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 385 आणि 505 ( 1 ) ( B ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ईमेल पाठवणाऱ्या अज्ञात आरोपीच्या आयपी अड्रेसचा शोध लावण्यात यश आलं आहे. लवकरच धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचा शोध लावण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Mumbai Airport : विमानतळावर एका व्यक्तीच्या बॅगेत 28 कोटी किंमतीचे 281 किलो कोकेन जप्त,एका भारतीय प्रवाशाला अटक
- Emergency Landing : बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा प्रवाशाचा दावा; पुणे दिल्ली विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग, एक प्रवाशी अटकेत