महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Threat Call To Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल; एक टँकर थांबवला अन्...

मुंबई पोलिसांना दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला टँकर घेऊन गोव्याला जात असल्याचा कॉल आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत एक संशयित टॅंकर पकडला. मात्र टँकर मध्ये कोणतीही बॉम्ब सदृश वस्तू अथवा स्फोटक पदार्थ आढळले नाहीत.

Mumbai Police
मुंबई पोलीस

By

Published : Jul 23, 2023, 5:21 PM IST

Updated : Jul 23, 2023, 8:07 PM IST

मुंबई : मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. फोन करणाऱ्याने म्हटले होते की, दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला टँकर घेऊन मुंबईहून गोव्याला जात आहेत. त्यानंतर पोलिसांनी तडक कारवाई करत रत्नागिरी जवळच्या वांद्री इथे एक संशयित टँकर पकडला. मात्र टँकरमध्ये काहीही संशयास्पद आढळलेले नाही.

टँकरची बॉम्ब शोधक पथकाद्वारे कसून तपासणी : या टॅंकरमध्ये पॉलिथिन बनवण्यासाठीचे सामान असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांची दिली आहे. याबाबत सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत. पोलिसांना धमकीचा कॉल आल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान संगमेश्वर येथे एक संशयित टँकर थांबवण्यात आला. त्यानंतर त्याची बॉम्ब शोधक पथकाद्वारे कसून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान टँकर मध्ये कोणतीही बॉम्ब सदृश वस्तू अथवा स्फोटक पदार्थ आढळले नाहीत.

मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी : मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून धमकीचा कॉल केला होता. कॉलरने विशिष्ट ठिकाणी काडतुसे आणि AK-47 असल्याचे म्हटले होते. तसेच त्याने मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी दिली होती. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिस हा कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०९ (२) अंतर्गत वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...तर उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल : या आधीही 12 जुलै रोजी असाच एक कॉल आला होता. कॉलद्वारे, भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर मायदेशी न परतल्यास शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. या संदर्भात अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 'सीमा हैदर परत न आल्यास, भारत नष्ट होईल', असे कॉलरने उर्दूमध्ये म्हटले होते. कॉलरने सांगितले की, 'जर हल्ला झाला तर त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल'. सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेला या महिन्याच्या सुरुवातीला ग्रेटर नोएडा येथे अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात चौकशी दरम्यान अफसर पाशाच्या छातीत दुखू लागले, उपचार सुरू
  2. Pune Crime News: रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा पसरविणाऱ्याला अटक, खोटा कॉल करण्याचे सांगितले धक्कादायक कारण
  3. Mumbai Hoax call : चाळीत बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणारा सापडताच पोलिसही चक्रावले..हट्ट पाहून काढली समजूत
Last Updated : Jul 23, 2023, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details