मुंबई: मुंबईतील प्रतिष्ठित लोकांच्या घरी बॉम्बस्फोट करणार असल्याचा फोन नागपूर पोलीस नियंत्रणाला अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलरने दावा केला की, उद्योजक येथे स्फोट होणार आहे.
बंगले उडवण्याची धमकी: तसेच अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरी आणि बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरीही बॉम्बस्फोट होणार असल्याचे कॉलरने सांगितले. या कॉलबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी कॉल करणाऱ्या कॉलरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी ही मुंबईतील प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध अशा व्यक्ती आहेत. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस आणि इतर तपास यंत्रणा कॉलरला शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अज्ञात कॉलरच्या फोन कॉलनंतर नागपूर पोलीस नियंत्रणाने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यांनतर मुंबई पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवून कॉलरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
काहीपूर्वी दिवसादेखील आला होता कॉल: मागील काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांच्या साउथ कंट्रोल रूमला देखील मुंबईतील बंदर परिसर आणि काही परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा कॉल आला होता. त्यानंतर केवळ नऊ तासातच मुंबई पोलिसांनी हॉक्स कॉलरला डहाणू येथून अटक केली होती. अश्विन म्हैसकर असे आरोपीचे नाव आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसात वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना देखील रात्री एकच्या सुमारास अज्ञात इसमाने कॉल करून मीरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याबाबत माहिती देणारा कॉल केला होता. त्याआधी देखील अनेक मुंबईवर दहशतवादी सावट असल्याचे निदर्शनास आणून देणारे कॉल प्राप्त झाले होते.
मुंबई रडारवर?: मागील काही दिवसांचा रेकॉर्ड पाहता मुंबईला सातत्याने धमक्यांचे फोन येत असल्याचे दिसून येते. मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर असलेच यातून दिसून येते. आपण पाहिले तर, गेल्या महिन्यात मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला धमकीचा फोन आला होता. ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला धमकीचा कॉल आला होता. ज्यात धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाने हॉस्पिटल उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हेही वाचा:Mumbai High Alert : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी सज्ज