महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोवंडीत सीएए-एनआरसी विरोधात हजारो नागरिकांचे जोरदार आंदोलन - गोवंडी एनआरसी-सीएए आंदोलन

शाहीनबाग आणि नागपाडा येथील महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी गोवंडीत नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले. गोवंडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात सुमारे दहा हजार महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात एकत्र आले.

आंदोलन
आंदोलन

By

Published : Jan 29, 2020, 12:32 PM IST

मुंबई -दिल्लीच्या शाहीनबाग येथे महिला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात बेमुदत आंदोलन करत आहेत. त्याच प्रमाणे मुंबईच्या नागपाडा येथेही महिलांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शाहीनबाग आणि नागपाडा येथील महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी गोवंडीत नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले.

गोवंडीत सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन

हेही वाचा - मोदी सरकारचा 'एनआरसी आणि सीएए'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे घडवण्याचा कट"

गोवंडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात सुमारे दहा हजार महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात एकत्र आले. यामध्ये देखील महिलांची संख्या लक्षणीय आहे. जमलेल्या नागरिकांनी कायद्याच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details