मुंबई -वैद्यकीय क्षेत्रामध्ये नीट परीक्षा दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. 2023 या वर्षीची नीट परीक्षा मार्चमध्ये होणार आहे. या या परीक्षेसाठी ज्यांची इंटर्नशिप 5 मार्च 2023 ला पूर्ण होणार तेच याला पात्र असते असतील. यामुळे राज्यातील सुमारे दहा हजार एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी नीट परीक्षेला मुकावे लागणार आहे. देशांमध्ये एकूण या परीक्षेला बसणाऱ्यांपैकी 75 टक्के विद्यार्थी या परीक्षेला मुकणार आहे.
विद्यार्थी राहणार नीट परिक्षेपासुन वंचित - नीट परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील ही परीक्षा देतात. यंदा संदर्भात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम यांनी त्याबद्दल आदेश जारी केलेला आहे. की नीट पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षा 5 मार्च 2023 ला होणार आहेत. ह्या परीक्षेसाठी ज्यांची इंटर्नशिप परीक्षेच्या आधी पूर्ण झाली असेल तेच पात्र ठरतील.'या होणाऱ्या परीक्षेमध्ये देशातील वैद्यकीय शिक्षण एमबीबीएसला शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत. तसेच महाराष्ट्र राज्यात देखील आठ ते दहा हजार विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाही.
कोणत्या कारणामुळे मुकावी लागेल परीक्षा -राज्यामध्ये 2017 साली एमबीबीएसच्या ज्या विद्यार्थ्यांनी इंटरशिप सुरू केली. त्यांची इंटर्नशिप ही नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम यांनी सांगितलेल्या तारखे नंतर पूर्ण होते. म्हणजे 5 मार्च 2023 नंतर पूर्ण होते. नीट परीक्षेमध्ये बसण्याआधी विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण व्हायला पाहिजे. मात्र 2017 मध्ये ज्यांनी इंटरशिप सुरू केलेली आहे. त्यांची इंटर्नशिप ही मे 2023 मध्ये संपते. त्यामुळे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यातील सुमारे आठ ते दहा हजार ज्युनियर डॉक्टर नीट परीक्षेला बसू शकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे काय होणार? ते परीक्षेला बसू शकतील की नाही याबाबत टांगती तलवार आहे. यासंदर्भात ज्युनिअर डॉक्टर मेडिकल असोसिएशन ऑल इंडिया यांच्या वतीने केंद्र शासनाला नुकताच मागणी पत्र देखील त्यांनी दिलेला आहे.
इंयर्नशिप पात्रता मुदत वाढवायला हवी -यासंदर्भात या परीक्षेला बसू शकणारे विद्यार्थी डॉक्टर रजत चांडक यांनी सांगितले की," नीट या परीक्षेला बसण्यासाठी जी पात्रता आहे. जसे की इंटर्नशिप ही या परीक्षेच्या आधी व्हायला हवी. मात्र आम्ही महाराष्ट्रातील हजारो डॉक्टर 2017 या वर्षी इंटरशिप सुरू केली. ही इंटर्नशिप 31 मार्च 2023 नंतर पूर्ण होते. त्यामुळे केंद्र शासनाने नीट परीक्षा मार्च 2023 ऐवजी मे किंवा जून 2023 या काळात ही परीक्षा घ्यावी. म्हणजे राज्यातील हजारो वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी नीट परीक्षेला बसू शकतील."
परीक्षेला बसणे आमचा मूलभूत हक्क -डॉक्टर इंद्रनील देशमुख यांनी सांगितले आहे की," नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम यांनी नुकत्याच एक महत्त्वाचे पत्र जाहीर केले आहे. त्यामध्ये म्हटलेले आहे की, नीट ची परीक्षा 2023 मध्ये होणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन असलेल्यांसाठी नीटची परीक्षा 5 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी ज्यांची इंटर्नशिप पूर्ण झालेली असेल त्यांनाच यामध्ये पात्र समजले जाईल. मात्र, देशातील एकूण जूनियर डॉक्टर पैकी 75 टक्के डॉक्टर यांची इंटर्नशिप ही मार्च 2023 नंतर पूर्ण होते. त्यामुळे केंद्र शासनाच्या या नियमामुळे त्यांना परीक्षेला बसता येत नाही. इंटर्नशिप मुदत केंद्र शासनाने वाढवायला हवी अशी आमची मागणी आहे. जर आम्हाला या परीक्षेला बसायला संधी मिळाली नाही तर संधीची समानता नाकारल्यासारखे होईल. परीक्षेला बसणे हा आमचा मूलभूत हक्क आहे." असल्याचे देशमुख म्हणाले.
नीट प्रवेश परीक्षेसाठी दीड लाख विद्यार्थी स्पर्धेत -नीट हे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट याचं लघुरुप आहे. सरकार संचलित सर्व वैद्यकीय संस्थांमधील अंडरग्रॅज्युएट मेडिकल अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा होते. उच्च शिक्षणासाठी असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच फेलोशिपसाठी स्वतंत्र, विशेष, स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं म्हटलं जातं. त्याद्वारे ही परीक्षा घेतली जाते. एनटीए संस्था ऑनलाइन अप्लिकेशन मागवणे, एन्ट्रन्स परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे तसेच ऑल इंडिया रँक डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेस, आरोग्य मंत्रालय यांना कळवणं अशी कामं करते.
नीट परीक्षेची माहिती एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट केली जाते. ती वाचण्यासाठी https://nta.ac.in/Home येथे क्लिक करा.
हेही वाचा -NEET PG 2023 : नीट पदव्युत्तर नोंदणी सुरू; जाणून घ्या शेवटची तारीख आणि एकूण प्रकिया