महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai-Kurla Crime News : कुर्ल्यातील त्या तिघी बहिणी निघाल्या चोर; मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांत डझनभर गुन्हे दाखल

कुर्ला परिसरातील तीन सख्ख्या बहिणींना सातत्याने होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यात ( Three Sisters From Dahisar Kurla Turned Out Thieves ) गुन्हे शाखा युनिट-12 ने अटक केली ( Crime Branch Unit 12 has Arrested Three Sisters ) आहे. या तिघी बहिणींचा परिसरातील अनेक चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. या तिघी बहिणींवर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात ( Dozens of Cases were Filed in Many Police Stations at Mumbai ) चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत.

Those Three Sisters From Kurlya Turned Out to be Thieves, Dozens of Cases were Filed in Many Police Stations at Mumbai
कुर्ल्यातील त्या तिघी बहिणी निघाल्या चोर; मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यांत डझनभर गुन्हे दाखल

By

Published : Dec 21, 2022, 5:18 PM IST

मुंबई :मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याची उकल करताना गुन्हे शाखा युनिट-12 ने कुर्ला परिसरातून तीन सख्ख्या बहिणींना अटक केली ( Crime Branch Unit 12 has Arrested Three Sisters ) आहे. ज्यांच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही बहिणी ( Three Sisters From Dahisar Kurla Turned Out Thieves ) अतिशय हुशार असल्याचे म्हटले जाते. त्या दिवसाढवळ्या निर्जन वसाहतीत ( Dozens of Cases Registered in Various Police Stations ) घुसून, चोरी करून पळून जात असताना, गुन्हे शाखेने त्यांच्याकडून चोरीच्या 4 सोन्याच्या अंगठ्या, 4 मोबाईल फोन आणि 24 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. सुजाता शंकर सकट (35), सारिका शंकर सकट (30) आणि मीना उमेश इंगळे (28) अशी अटक केलेल्या तीन बहिणींची नावे आहेत.

कुर्ल्यातील त्या तिघी बहिणी निघाल्या चोर; मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यांत डझनभर गुन्हे दाखल

सीसीटीव्हीवरून उघड झाले :29 नोव्हेंबर रोजी कस्तुरबा पोलीस ठाण्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या परिसरात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये तिन्ही संशयित महिला दिसल्या, तेव्हा घरात घुसून चोरी करणाऱ्या याच महिला असल्याचे निष्पन्न झाले. कॅमेऱ्यात दिसणारी महिला ऑटोरिक्षात बसताना दिसत होती. पोलिसांनी सदर रिक्षा ताब्यात घेतली, माहिती काढल्यानंतर त्या महिलेचा ठावठिकाणा लागला.

त्या तिघी चोर बहिणी कुर्ल्याच्या :गुन्हे शाखेचे सपोनि रासकर, मपोउनी शेख, पोह बागवे, मपोह पाटील यांच्या पथकाने त्या महिलांना कुर्ला परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. तिघींनाही अटक केल्यानंतर कस्तुरबा पोलिसांच्या स्वाधीन करून जप्त केलेले दागिने आणि पैसेही त्यांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या महिला आरोपींविरुद्ध वनराई, विक्रोळी, मुलुंड, डोंबिवली, जुहू, सांताक्रुझ, कांदिवली, घाटकोपर आणि ठाणे, नगर पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत. तपासात या चोरट्या महिला सख्ख्या बहिणी असून, कुर्ल्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब चोरीमध्ये गुंतलेले आहे. या सर्वांवर मुंबईतील डझनभर पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details