मुंबई- सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे जगभरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण, या कोरोनासारख्या रोगाशी दोन हात करण्यामध्ये जगभरातील वैद्यकीय सेवा देत आहे. तसेच, यंदा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची 200 वी जयंती आहे. यामुळे यंदाचे वर्ष जागतिक परिचारिका वर्ष म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे.
यंदाचे वर्ष जागतिक परिचारिका वर्ष, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती - जागतिक परिचारिका वर्ष बातमी
फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचे हे 200 वे जयंतीवर्ष आहे. यामुळे यंदाचे वर्ष जागतिक परिचारिका वर्ष म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे.
फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी समर्पित केले होते. तसेच त्यांनी हायजीन थेअरी मांडली होती. म्हणजेच रुग्णसेवा बजावत असताना रुग्ण व परिचारिका या दोघांनाही स्वच्छता राखणे गरजेचे असते. कोरोना विरोधातील युद्धामधील सर्वांत महत्वाची भूमिका ही स्वच्छतेचीच आहे. कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी सतत हात धुणे गरजेचे आहे. कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये एका योद्ध्याप्रमाणे लढा देणाऱ्या परिचारिकांच्या सन्मानासाठी हे वर्ष जागतिक परिचारिका वर्ष म्हणून साजरा होत आहे.
हेही वाचा - जागतिक परिचारिका दिन : 'एकीकडे आमचा सन्मान, तर दुसरीकडे पगार कपात'