मुंबई - बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक रद्द केली. औरंगाबाद व इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही, हे दुर्दैव आहे. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बॅंक बरखास्त करण्यासाठी रचलेले कारस्थान आहे, असा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला. तसेच या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुंडे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन केली.
निवडणूक रद्द करण्याचा डाव -
बीड जिल्हा बॅंकेची निवडणूक घेण्याची जबाबदारी शासनाच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची आहे. परंतू निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज बाद करणे, संचालक मंडळाची रचना निवडणुकीनंतर पूर्ण होत नसल्यामुळे बँकेवर प्रशासक व नंतर प्रशासकीय मंडळ नेमणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांच्यावर राजकीय दबाव टाकून निवडणूक रद्द करण्याचा डाव आखणे, असे प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पदाचा दुरुपयोग -