महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 33 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, 1 हजार 497 जणांवर उपचार सुरू

अवैध वाहतुकीच्या 1 हजार 330 प्रकरणात 23 हजार 866 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 हजार 197 वाहन जप्त करण्यात आली असून तब्बल 6 कोटी 62 लाख 72 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 46 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.

मुंबई कोरोना न्यूज
मुंबई कोरोना न्यूज

By

Published : Jun 7, 2020, 2:21 PM IST

मुंबई - लॉकडाऊन काळात राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत दर दिवशी भर पडत असून राज्य पोलीस दलात कोरोनाच्या संसर्गामुळे 33 पोलिसांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही कोरोनाबधित 1 हजार 497 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 196 पोलीस अधिकारी तर 1 हजार 301 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 23 हजार 424 गुन्हे नोंदविण्यात आले असून मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 718 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 260 घटना घडल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 841 जणांना अटक करण्यात आली आहे. कोविड-19 च्या संदर्भात तब्बल 1 लाखाहून अधिक कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत.

अवैध वाहतुकीच्या 1 हजार 330 प्रकरणात 23 हजार 866 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 हजार 197 वाहन जप्त करण्यात आली असून तब्बल 6 कोटी 62 लाख 72 हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 46 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details