महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thirty Six Special Holiday Trains : खुशखबर..! उन्हाळी सुट्यांसाठी मध्य रेल्वे मार्गावर 36 विशेष रेल्वे सोडणार - उन्हाळी सुटी

उन्हाळी सुटीनिमित्त बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 36 साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते मालदा टाऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे
रेल्वे

By

Published : Apr 7, 2022, 10:33 PM IST

मुंबई -उन्हाळी सुटीनिमित्त बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 36 साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते मालदा टाऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सीएसएमटी ते नागपूर 18 फेऱ्या -रेल्वे क्रमांक 01033 साप्ताहिक अतिजलद विशेष एक्सप्रेस 9 एप्रिल, 2022 ते 4 जून, 2022 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शनिवारी मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल. रेल्वे क्रमांक 01034 साप्ताहिक अतिजलद विशेष एक्सप्रेस 10 एप्रिल, 2022 ते 5 जून, 2022 पर्यंत नागपूर येथून दर रविवारी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे.

सीएसएमटी ते मालदा टाउन 18 फेऱ्या -रेल्वे क्रमांक 01031 साप्ताहिक अतिजलद विशेष एक्सप्रेस 11 एप्रिल, 2022 ते 6 जून, 2022 पर्यंत दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसऱ्या दिवशी मध्य रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे. रेल्वे क्रमांक 01032 साप्ताहिक अतिजलद विशेष एक्सप्रेस 13 एप्रिल, 2022 ते 8 जून, 2022 पर्यंत दर बुधवारी मालदा टाउन येथून दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी मध्यरात्री 3 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे. या दोन्ही गाड्यांना दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज,छिवकी, मिर्झापूर, बक्सर, आरा, पटना, अभयपुर, जमालपुर, सुलतानगंज ,भागलपूर या स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे.

तिकिटाचे आरक्षण सुरू -मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते या दोन्ही उन्हाळी विशेष एक्सप्रेस गाडीचे आरक्षण उद्यापासून विशेष शुल्कासह सुरू होणार आहे. प्रवाशांनी संगणीकृत आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेत स्थळावर जाऊन आरक्षण करता येणार आहे.

हेही वाचा -NCB Action Against Drug Pedler : एनसीबीने मार्च महिन्यात केलेल्या कारवाईत 13 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details