मंबई - महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच १३ हजार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या गेल्या, तरी याचा साधा थांगपत्ता या सरकारला लागला नाही. त्यामुळे हे भाजप सरकार नेमकं करतंय काय? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने सरकारला केला आहे.
महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच १३ हजार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या गेल्या - काँग्रेस - महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे
महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या बीडमध्ये १३ हजार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या गेल्या आहेत. तरी याचा साधा थांगपत्ता या सरकारला लागला नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील १३ हजार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या गेल्या आहेत. अनेक प्रकरणामध्ये विविध आजारांची भीती दाखवून या शस्त्रक्रिया केल्या असल्याची बाब समोर आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. खासगी रुग्णालयासोबत सरकार रुग्णालयातही या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे भाजप सरकार नेमकं करतंय काय? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. प्रचारामधून जर थोडी फुरसत मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी या कारभाराकडे लक्ष द्यावे असेही काँग्रेसने म्हटले आहे.