मुंबई - नोकरीच्या नावाखाली शेकडो तरुणांना फसवणाऱ्या कॉल सेंटरचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. ताज सैट्स एयर कॅटरिंग लिमिटेडच्या नावाखाली नोकरी देण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावला जात होता. या प्रकरणी बनावट कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांनी छापा मारला आहे.
नोकरीच्या नावाखाली शेकडो बेरोजगारांना गंडा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे मुंबई विमानतळावर ताज सैट्स एयर कॅटरिंगसाठी नोकरी असल्याचे सांगत जाहिरात प्रसारीत करण्यात आली होती. यासाठी युनिव्हर्सल ग्रुपच्या माध्यमातून ही नोकरभरती सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. सोशल मीडियाद्वारे जाहिरात देऊन अनेक बेरोजगार तरुणांना ताज सैट्स एयर कॅटरिंगमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले जात होते. शिवाय, प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तब्बल 2 ते 3 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली जात होती. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. यानंतर गुन्हा नोंदवून तपास करण्यात आला. त्यानुसार, युनिव्हर्सल ग्रुपच्या मिळालेल्या पत्त्यावर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याचे लक्षात आले.
आरोपींना पोलीस कोठडी