महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला महुर्त सापडला, १३ जणांचा उद्या होणार शपथविधी - aashish shelar

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रलंबीत असलेला राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) होणार आहे. यामध्ये १३ जणांना नव्याने मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. उद्या सकाळी ११ वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला महुर्त सापडला

By

Published : Jun 15, 2019, 10:29 PM IST

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रलंबीत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) होणार आहे. यामध्ये १३ जणांना नव्याने मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. उद्या सकाळी ११ वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मूहूर्त सापडला आहे. उद्या १३ जण नव्याने मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर १३ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यामध्ये विद्यमान काही मंत्र्यांना नारळ देण्यात येणार आहे.

'या' १३ जणांना मिळणार संधी

१) जयदत्त क्षिरसागर (शिवसेना)
२) दिपक केसरकर (शिवसेना)
३) तानाजी सावंत (शिवसेना)
४) अविनाश महातेकर (आरपीआय)
५) संजय कुटे (भाजप)
६) अनिल बोंडे (भाजप)
७) अशोक उईके (भाजप)
८) परिणय फुके (भाजप)
९) मदन येरावार (भाजप)
१०) अतुल सावे (भाजप)
११) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
१२) संजय शिरसाठ (शिवसेना)
१३) आशिष शेलार (भाजप)

'या' विद्यमान मंत्र्यांना मिळणार डच्चू

१) प्रविण पोटे पाटील (राज्‍यमंत्री उदयोग आणी खाण)
२) प्रकाश मेहता ( गृहनिर्माण उद्योगमंत्री)
३) विद्या ठाकूर (महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री)
४) राजकुमार बडोले (सामाजिक न्यायमंत्री)

ABOUT THE AUTHOR

...view details