महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cloth Theft Incident Mumbai: उच्चभ्रू ग्राहक बनून आल्या अन् 7.5 लाखांचे कपडे चोरून झाल्या फुर्रर्र..; महिला चोरांचा प्रताप - Thieving women stole clothes

ग्राहक बनून आलेल्या चार चोर महिलांच्या टोळीने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शोरूममधून 7.5 लाखांचे कपडे चोरल्याची घटना मुंबईतील विले पार्ले येथील एका शोरूममध्ये 8 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात 'एफआयआर' नोंदवला गेला असून महिला चोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. कपडे चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Cloth Theft Incident Mumbai
कपडे चोरी

By

Published : Apr 17, 2023, 9:20 PM IST

मुंबई:हे दुकान खास स्टायलिश पोशाखांचे शोरूम असून महागड्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. चोरी गेलेल्या कपड्यांमध्ये एका अनारकली ड्रेस मटेरिअल (किंमत साडेतीन लाख रुपये), लेहेंगा (किंमत तीन लाख रुपये) आणि एका गाऊनचा (किंमत एक लाख रुपये) समावेश आहे. अशा प्रकारे एकूण सात लाख पन्नास हजार रुपयांचे पोशाख चोरीला गेले.


मालकाला धक्काच बसला: शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलांची टोळी कपडे खरेदीच्या बहाण्याने शोरूममध्ये गेली आणि लाखोंचा माल चोरून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या महिला स्वत:ला श्रीमंत कुटुंबातील असल्याचे भासवत होत्या; मात्र प्रत्यक्षात त्या चोर निघाल्या. साडेसात लाखांचे नुकसान झाल्याने शोरूमच्या मालकाला धक्का बसला आहे. जुहू पोलिसांची टीम लवकरच या चार महिलांना अटक करून चोरीचे कपडे परत मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मोबाईल शोरूममध्ये चोरी: ठाणे जिल्ह्यात एकेकाळी दुकानफोडी करणाऱ्या चादर गँगने धुमाकूळ घातला होता. मध्यरात्रीनंतर मोबाईल विक्रीचे दुकानानाचे शटर फोडून लाखोंचे मोबाईल लंपास केले होते. आता पुन्हा चादर गँग कल्याणात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. या गँगमधील चोरट्यांनी कल्याण पश्चिम भागात असलेल्या अहिल्याबाई चौकातील एका मोबाईलच्या दुकानाचे शटर तोडून ३ मिनिटात ३० लाखांचे मोबाईल लंपास केले आहे. ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार कुमार चंदन पवनकुमार झा (वय ४०) हे भिवंडी तालुक्यातील कोनगाव राहत आहे. त्यांचे कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई चौकात मोबीवर्ल्ड नावाने मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानात २६ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत शिरले, त्यानंतर दुकानातील महागडे तब्बल ३ लाखांचे मोबाईल घेऊन पसार झाले. दरम्यान दुकान मालक कुमार चंदन पवनकुमार झा यांनी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले.

हेही वाचा:Calicut Train Arson Case : कालिकत ट्रेन जाळपोळ प्रकरणी दहशतवादी संबंधांची पुष्टी, तपास पथकाद्वारे UAPA आरोपाचा अहवाल सादर

ABOUT THE AUTHOR

...view details