महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंच्या रॅलीत चोरट्यांनी केला हात साफ; १३ सोनसाखळ्यांसह ४ मोबाईल लंपास - mumbai

गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या रॅलीमध्ये चोरट्यांनी धूमाकूळ घातला होता. यात १३ सोनसाखळ्या आणि ४ मोबाईल चोरीला गेले आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

रॅलीतील छायाचित्र

By

Published : Oct 7, 2019, 4:23 PM IST

मुंबई- येथील वरळी विधानसभा क्षेत्रातून आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे 3 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आदित्य ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात चोरट्यांनी हात साफ केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा - 'आरे आंदोलनकर्त्यांची ठाणे कारागृहातून सुटका'

3 ओक्टॉबरला वरळीतील गणपतराव कदम मार्गावर जमलेल्या गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरांनी तब्बल 13 सोनसाखळ्या आणि 4 मोबाईल फोन हातोहात लांबविल्याची घटना समोर आली आहे . याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - उद्धव ठाकरेंची गर्जना, शिवसेनेचा 'मुख्यमंत्री' करणार म्हणजे करणारच!

ABOUT THE AUTHOR

...view details