मुंबई :त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी कोल्ड क्रीमपासून ते लोशनपर्यंत बाजारात ( winter Moisturize ) येतात. पण घरगुती उपाय करून पाहिल्यास कोरड्या त्वचेपासून दीर्घकाळ आराम ( winter skin care tips ) मिळेल. यासोबतच चेहराही निस्तेज दिसेल. चला तर मग जाणून घेऊया असा कोणता फेस पॅक आहे जो त्वचेला मॉइश्चरायझ करतो तसेच निस्तेजपणा दूर करतो आणि तो चेहऱ्याला सुंदर ( Dry Skin In Winter ) बनवतो.
नारळाचे तेल मध फेस पॅक :कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेलात थोडे मध मिसळून पेस्ट ( Coconut Oil Honey Face Pack ) बनवा. ही पेस्ट चेहरा, मान, हात आणि पायांवर लावा. नंतर काही वेळाने स्वच्छ करा. हा फेस पॅक आठवड्यातून तीनदा लावल्याने तुम्ही कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवू शकता. तसेच त्वचा नैसर्गिकरित्या चमकते. त्यामुळे तुम्हाला वेगळे मॉइश्चरायझ लावण्याची गरज नाही.