मुंबई: मुंबईत रविवारी टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात हौशी गटात फुल मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन ३. १० किलोमिटर रन, फुल मॅरेथॉन - इलाईट, चॅम्पीयन विथ डिसेब्लीटी रन, सिनियर सिटीझन रन, ड्रिम रन अशा सात प्रकारात होत आहे. मॅरेथॉनचा मार्ग हा दक्षिण तसेच मध्य वाहतूक विभाग हद्दीतील एम आर ए आझाद मैदान, काळबादेवी, डि.बी.मार्ग, मलबार हिल, ताडदेव, वरळी, बांद्रा, दादर व माहिम असा आहे. मॅरेथॉन स्पर्धकांसाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी या मार्गावरील वाहतूक पर्यायी व्यवस्था करून इतरत्र वळवन्यात आली आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांनी दिली आहे. हे वाहतूक व्यवस्थापन १५ जानेवारीच्या पहाटे ३ वाजल्यापासून दुपारी १३.१५ वाजेपर्यंत असणार आहे.
मॅरेथॉनचे मार्ग :फुल मॅरेथॉन हौशी गटाची वेळ सकाळी ०५. १५ ते १.१५ वाजेपर्यंत आहे. याची सुरवात सी.एस.एम.टी. - डॉ. डी. एन. रोड- उजवे वळण विर नरीमन रोड डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग उजवे वळणे मादाम कामा रोड महर्षी कर्वे रोड डावे वळण विर नरीमन रोड डावे वळण एन. एस. रोड यु टर्न एअर इंडीया बिल्डीग जंक्शन परत मरिन ड्राईव्हने चौपाटी उजवे वळण बाबुलनाथ मार्ग डावे वळण एन. एस. पाटकर मार्ग केमस कॉर्नर ब्रिज हाजीअली लाला लजपतराय मार्ग डॉ. अॅनी बेझंट मार्ग मेला रेस्टारंट डावे वळण खान अब्दुल गफारखान रोड- बांद्रा वरळी सी लिंक टोल प्लाझा-बांद्रा- माहिम कॉजवे उजवे वळण
सीएसएमटीला शेवट: जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग माहिम चर्च उजवे वळण कॅडल रोड स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सिध्दिविनायक मंदिर डॉ. अॅनी बेझंट मार्ग ग्लॅक्सो-पोदार हॉस्पीटल जंक्शन ना उजवे वळण थडाणी मार्ग उजवे वळण खान अब्दुल गफारखान मार्ग आय. एन. एस त्राता नारायण हर्डीकर मार्ग यु टर्न, खान अब्दुल गफार खान मार्ग वरळी सी फेस वरळी डेअरी मेला जंक्शन डॉ. अॅनी बेझंट रोड-लाला लजपतराय मार्ग हाजीअली केम्स कॉर्नर ब्रिज आर. टी. आय जंक्शन उजवे वळण बाबुलनाथ मार्ग डावे वळण बॅन्डस्टँड डॉ एन पुरंदरे मार्ग एन. एस. मार्ग परत त्याच मार्गे विर नरीमन रोड पर्यंत हुतात्मा चौक येथे डावे वळण डि.एन. रोड डावे वळण सी. एस. एम. टी. जंक्शन येथे समाप्त होणार आहे.
अर्ध मॅरेथॉन : अर्ध मॅरेथाॅनची वेळसकाळी ०५.१५ ते ०९.५५ वाजेपर्यंत आहे, सुरवात माहिम रेती बंदर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ कार्यालय समोरील मैदान येथे होणार आहे. नंतर ती जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, कोंबडी गल्ली, बांद्रा रिक्लेमेशन डावे वळण घेऊन एम. एस. आर. डी.सी. बांद्रा रिक्लेमेशन बेस्ट बस डेपो युटर्न वरळी सी. लीक टोल नाका खान अब्दुल गफारखान रोड मेला हॉटेल जंक्शन- अॅनी बेझंट रोडने नेशनल स्पोटर्स क्लब ऑफ इंडीया पर्यत लाला लजपतराय मार्ग-हाजीअली जंक्शन भुलाबाई देसाई रोड ने महालक्ष्मी जंक्शन पर्यत गोपालराव देशमुख मार्ग ( पेडर रोड) केम्स कॉर्नर ब्रिज बाबुलनाथ टेम्पल रोड बॅन्डस्टँड डॉ एन पुरंदरे मार्ग गिरगाव चौपाटी एन. एस. मार्ग सुंदर, महल जंक्शन विर नरीमन रोड पर्यंत पारसी विहीर डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाने ओसीएस जंक्शन येथे समाप्त होणार आहे.
१० किलोमीटर रन :ची वेळ ०६.०० ते ०८.०० वाजेपर्यंत आहे, सुरवात डी. एन. रोड हुतात्मा चौक येथुन विर नरीमन रोड डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग उजवे वळण मादाम कामा रोड उजवे वळण महर्षी कर्वे रोड डावे वळण विर नरीमन रोड डावे वळण एन. एस. रोड एअर इंडीया बिल्डीग जंक्शन येथे यु टर्न एन. एस. रोड ने. महतलाल बाथ पर्यत युडर्न एन. एस. रोड, साऊथ बॉन्ड बीझारीया जंक्शन डावे वळण विर नरीमन रोड डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाने ओसीएस. जंक्शन येथे समाप्त होणार आहे.