महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाधवान कुटुंबाच्या 2 विमानांसह एका बोटीचा ऑगस्टमध्ये लिलाव, पीएमसी बँकेकडून कारवाई - वाधवान कुटुंबाच्या 2 विमानांचा लिलाव होणार

पीएमसी बँकेला कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या वाधवान (एचडीआय कंपनी) कुटुंबीयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. याच जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतील दोन विमानाचा आणि एका बोटीचा लिलाव आता होणार आहे. पीएमसी बँकेकडून ऑगस्टमध्ये हा लिलाव करण्यात येणार आहे.

There will be an auction of 2 planes and one boat of Wadhwan family
वाधवान कुटुंबाच्या 2 विमानांसह एका बोटीचा ऑगस्टमध्ये लिलाव

By

Published : Jul 24, 2020, 8:19 PM IST

मुंबई - पीएमसी बँकेला कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या वाधवान (एचडीआय कंपनी) कुटुंबीयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. याच जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतील दोन विमानाचा आणि एका बोटीचा लिलाव आता होणार आहे. पीएमसी बँकेकडून ऑगस्टमध्ये हा लिलाव करण्यात येणार आहे. महागडी आणि नामांकित कंपनीची ही विमानं असून आता या लिलवातून पीएमसी बँकेला किती रक्कम मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पीएमसी बँकेच्या संकेतस्थळावर या लिलावाबाबतची माहिती टाकण्यात आली. या माहितीनुसार वाधवान कुटुंबाच्या मालकीच्या जप्त दोन विमान आणि एका बोटीचा लिलाव करण्यात येणार आहे. 17 ऑगस्टला दुपारी 2 वाजता बँकेच्या भांडुप पश्चिम शाखेत बोटीचा लिलाव होईल. तर 21 ऑगस्टला दोन विमानाचा लिलाव होईल. एक विमान Dassault falcon कंपनीचे तर एक विमान Bombardier challenger कंपनीचे आहे. या विमानांची किंमत 200 ते 300 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. तर बोट Ferrerti yach 881 या कंपनीची आहे. तर याची किंमत 40 ते 50 कोटींच्या घरात आहे.

या लिलावासाठी बॅंकेने निश्चित अशी किंमत लावलेली नाही. पण जो अधिकाधिक किंमत लावेल त्याला ही विमान आणि बोट विकली जाणार आहे. त्यामुळे आता या लिलावातून नेमकी किती रक्कम मिळणार हे आता महत्वाचे आहे. दरम्यान, ही दोन विमान सद्या मुंबई विमानतळावर पार्क करण्यात आली आहेत. तर बोट श्रीलंका येथील एका डॉकवर पार्क करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details