मुंबई17 व्या लोकसभेच्या अनुषंगाने समितीने महत्त्वपूर्ण अहवाल तयार केला आहे. यात सुरुवातीलाच म्हटले आहे की, या समितीला अत्यंत दुःख आणि खेद वाटत आहे की, भारत सरकारच्या केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा, राष्ट्रीय मिलट्री स्कुल या ठिकाणी central educational institutions प्रवेश आणि रोजगारा बाबत अद्यापहि ओबीसींच्या संदर्भात कोणतीही तरतूद There is still no reservation for OBCs नाही. ही अत्यंत खेदपूर्ण परिस्थिती असल्याचे सांगत सरकार द्वारा अधिनियमित असलेल्या केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि आरक्षणा बाबत अधिनियम २००६ हा अस्तित्वात आहे. या कायद्यानंतर सतरा वर्ष झाले तरीही कुठलीही संशोधन कुठलीही केली गेलेली नाही. केंद्रीय शिक्षण संस्थांत प्रवेश आणि आरक्षण अधिनियमात ओबीसीं विद्यार्थ्यांना अनिवार्य पद्धतीने आरक्षण दिलं गेले पाहिजे असे समितीला वाटते असे नमुद करण्यात आले आहे.
शिक्षण मंत्रालयाचे उत्तरकेंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय अशा केंद्रीय शिक्षण संस्थांच्या प्रवेश आणि रोजगाराच्या बाबतीत आरक्षण नाही या संदर्भात खेदाची बाब प्रगट करत केंद्र सरकारला या संदर्भात प्रश्न विचारले गेले होते. त्यात केंद्र सरकारने उत्तरा दाखल सांगितले की, ओबीसींच्या कल्याणासाठीच्या संसदीय समिती अहवाल लोकसभेच्या सभापतींकडे सोपवला आहे. त्या अनुषंगाने शिक्षण मंत्रालयाने विचार केलेला आहे. त्यानुषंगाने 2021 मध्ये ओबीसींच्या साठी काही निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. मात्र सरकारच्या उत्तरनंतर सुद्धा समितीने अहवालात टिपणी केली आहे. राज्यघटनात्मक जे प्रवर्ग शैक्षणिक संदर्भात केले गेलेले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातींच्या संदर्भात उमेदवारच उपलब्ध नाही असे म्हटले आहे तर आदिवासींच्या संदर्भात केवळ पाच उमेदवार 67 जागांपैकी उपलब्ध झाले आहेत. ओबीसी उमेदवार देखील उपलब्ध नाही तसेच संरक्षण क्षेत्रामध्ये 62 पैकी 16 जागा एससी करिता उपलब्ध केल्या आहेत. तर सर्वसाधारण तर ठिकाणी 62 पैकी 46 उपलब्ध आहे. त्यामुळे एकूण अनेक केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओबीसींच्या शिक्षणाचा प्रवेश हा त्यामुळे मिळत नसल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे.