महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sugarcane : राज्यात अजूनही 80 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक - 70 million metric tons of Sugar Exported

राज्यात यंदा उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी ऑक्‍टोबरपासून गाळप हंगाम सुरू केला असला तरी अद्यापही राज्यात सुमारे 80 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Apr 19, 2022, 10:41 PM IST

मुंबई -महाराष्ट्रात दरवर्षी उसाचा गाळप हंगाम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होतो. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा उसाचे उत्पादन विक्रमी झाल्याने गाळप हंगाम संपत आला तरीही राज्यातील ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये अजूनही 70 ते 80 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. यामुळे राज्यातील कारखाने आणि शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

किती कारखाने करत आहेत गाळप..? -यंदा राज्यात लवकरच गाळप हंगाम सुरू करण्यात आला. ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू असून राज्यातील 99 सहकारी कारखाने तर तितकेच खासगी कारखाने उसाचे गाळप करत आहेत. तरीही अद्याप ऊस संपलेला नाही याचे मुख्य कारण म्हणजे ऊस तोडणीला मजूर कंटाळले आहेत. त्यातच हार्वेस्टरची कमतरता भासत असल्याने उसाची तोडणी मंदावली आहे. यंदा कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये उसाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे ऊसतोड मजूर अन्य राज्यात गेल्याने मजुरांची टंचाई जाणवत आहे. राज्यातील 198 साखर कारखान्यांपैकी 46 साखर कारखान्यांचे गाळप पूर्णपणे बंद ( Sugar Factory ) असल्याने या कारखान्यांची धुराडी आता बंद झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणचे मजूर अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करूनही मजूर कंटाळल्याने ऊसतोड करत नाहीत, अशी माहिती राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी दिली.

हार्वेस्टर हाच एक पर्याय -ऊस तोडणीसाठी आता हार्वेस्टर ( Harvester ) लावून मोठ्या प्रमाणात ऊसतोड केली पाहिजे. इतकाच पर्याय साखर कारखान्यांसमोर शिल्लक राहिला आहे. मात्र, हार्वेस्टर मालकांनी ऊसतोड दरात मोठी वाढ केल्याने नेमके काय करायचे, असा प्रश्न कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे. यासाठी आता येत्या 20 एप्रिल रोजी साखर संघाने साखर कारखानदार आणि हार्वेस्टरच्या मालकांची एक बैठक आयोजित केली आहे.

70 लाख मेट्रिक टन साखर निर्यात -यंदा मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन होणार असून आतापर्यंत 70 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात आली ( 70 million metric tons of Sugar Exported ) असल्याची माहितीही खताळ यांनी दिली. दरवर्षी पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील ऊस तोडणीसाठी मराठवाड्यातून मजूर येतात. मात्र, यंदा मराठवाड्यातही उसाचे विक्रमी पीक आल्याने राज्यभरात मजुरांची कमतरता जाणवत असल्याचे खताळ यांनी सांगितले.

हेही वाचा -Raju Shetty Criticism on Sharad Pawar : शेतकऱ्यांनी शेती करावी की कारखाना ताब्यात घ्यावा - राजू शेट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details