महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही- लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अजय एकनाथ राहिरकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या दोघांना न्यायालयाने बॉम्बस्फोट संदर्भात काही प्रश्न विचारले. मात्र, याबद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही, असे उत्तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दिले.

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

By

Published : Jun 13, 2019, 7:46 PM IST

मुंबई - आज मुंबईतील विशेष न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अजय एकनाथ राहिरकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या दोघांना न्यायालयाने बॉम्बस्फोट संदर्भात काही प्रश्न विचारले. मात्र, याबद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही, असे उत्तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दिले.


आज झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मालेगाव बॉम्बस्फोट झाला, या बद्दल तुम्हाला काही माहिती आहे? आणि आतापर्यंत किती साक्षीदारांची साक्ष झाली आहे?, असे प्रश्न न्यायालयाने त्यांना विचारले.


यावेळी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी 'I HAVE NOTHING TO SAY ( या बद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही)' असे उत्तर दिले आहे. तर अजय राहिरकर या आरोपीने 'या घटनेतील साक्षीदारांची साक्ष खरी असून मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना खरी आहे', असे उत्तर दिले.


मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह म्हणतात...
दरम्यान 7 जून रोजी झालेल्या मुंबईतील विशेष न्यायालयात इतर आरोपींसह साध्वी प्रज्ञा सिंग हजर झाल्या होत्या. 2008 साली मालेगाव बॉम्बस्फोट झाला याबद्दल काही माहिती होती का? असा प्रश्न न्यायालयाने आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना विचारला होता. यावेळी 'मला याबद्दल काहीही माहीत नाही', असे साध्वी यांनी म्हटले होते. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी समीर कुलकर्णी याने 'हे वास्तव आणि सत्य आहे', असे उत्तर दिले होते. याचबरोबर या प्रकरणातील आणखीन एक आरोपी दयानंद पांडे याने 'याबद्दल मला काहीही माहिती नसून मालेगावचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले होते', असे उत्तर दिले आहे.


मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मृतांचे नातेवाईक, डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, जखमी यांचे जबाब नोंदवले आहेत. तुम्हाला माहिती आहे का? किती साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहेत? असा प्रश्न न्यायालयाने आरोपींना केला होता. यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी किती झाल्या माहीत नाही, मात्र साक्षी झाल्यात हे माहीत आहे', असे उत्तर दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details