मुंबई- मुंबईत येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत पाऊस पडला असला तरी, कुठेही पाणी साचण्याच्या घटना समोर आलेल्या नाहीत. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत
मुंबईत बुधवार सकाळी 8 ते आज (गुरुवार) सकाळी 8 या 24 तासात शहर विभागात 76.16 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 24.12 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 33.80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात विश्रांती घेत पाऊस पडल्याने शहरात कुठेही पाणी साचण्याच्या घटना समोर आलेल्या नाहीत. शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.