महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काश्मीरमध्ये जाऊन गुंतवणुक करण्याची घाई कशाला ? शरद पवारांचा राज्य सरकारला टोला - महाराष्ट्र पर्यटन मंत्री जयकुमार रावल

काश्मीरमध्ये रिसॉर्ट आणि हॉस्पिटॅलीटी इंडस्ट्री उभारणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केली. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. 'पर्यटनाचा काय विकास करायचा तो इथे राज्यातल्या पर्यटन आणि उद्योगात करावा. कश्मीरमधे जाऊन गुंतवणुक करण्याची घाई कशाला करता?' असा प्रश्न शरद पवारांनी राज्य सरकारला केला आहे.

काश्मीरमधे जाऊन गुंतवणुक करण्याची घाई कशाला ? शरद पवारांचा राज्य सरकारला टोला

By

Published : Aug 7, 2019, 8:57 PM IST

मुंबई - राज्यातील उद्योगधंदे संकटात आहेत. महाराष्ट्रात आर्थिक मंदी असताना काश्मीरमधे जाऊन गुंतवणुक करण्याची घाई कशाला करता? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

काश्मीरमधे जाऊन गुंतवणुक करण्याची घाई कशाला ? शरद पवारांचा राज्य सरकारला टोला
संसदेमधे ३७० कलम दुरुस्तीनंतर काश्मीरमधे गुंतवणुकीसाठी संधी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी म्हटले आहे. याला प्रतिसाद देत महाराष्ट्र पर्यटन महामंडळ पुढाकार घेऊन काश्मीर, लेह लडाखमध्ये गुंतवणूक करेल. तसेच काश्मीरमध्ये रिसॉर्ट आणि हॉस्पिटॅलीटी इंडस्ट्री उभारणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केली. ३७० दुरुस्तीनंतर अमित शाहांनी केलेल्या काश्मीरातील शांतता आणि विकासाच्या घोषणा प्रत्यक्षात आणाव्यात. महाराष्ट्रात सध्या आर्थिक मंदी आहे. अनेक उद्योग धंदे अडचणीत आहेत. राज्याला ७५०० किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. पर्यटनाचा काय विकास करायचा तो इथे राज्यातल्या पर्यटन आणि उद्योगात करावा.कश्मीरमधे जाऊन गुंतवणुक करण्याची घाई कशाला करता? असा प्रश्न शरद पवारांनी राज्य सरकारला केला आहे.कायदा दुरुस्तीची प्रक्रिया झाल्यावर पर्यटन महामंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष काश्मीरला भेट देऊन, यासंदर्भात चाचपणी करतील. लवकरच काश्मिरात महाराष्ट्राचे अस्तित्व उभे राहील, असे पर्यटन मंत्री रावल म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details