मुंबई : महाराष्ट्र न्यायाधिकरण विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्याच्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांच्या खंडपीठाने हे आदेश जारी केले आहेत. प्रसार माध्यमांमध्ये न्यायधीशानी पाहिले की "सरकारी शाळेत मुले जमिनीवर बसलेले आहेत आणि शेजारी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. याची न्यायालयाने अत्यंत गंभीरपणे दखल घेतली. महाराष्ट्र शासनाच्या स्वतःच्या 65,000 शाळा आणि अनुदानित 25,000 मिळून सुमारे एक लाख शाळा राज्यांत आहेत. बहुसंख्य शाळांमध्ये विज, पाणी, प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
त्यातही 18 महिने पासून हजारो शाळांमध्ये वीज पुरवठा नसल्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे . प्रसार माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली .आणि स्वतः न्यायाधीशांनी त्याबाबतचा फोटो पाहिले तर त्यात दिसत आहे की, सरकारी शाळांमध्ये मुले जमिनीवर बसलेली आहेत. शाळेत दारूच्या बाटल्या देखील विखुरलेल्या दिसत आहेत.
याची दखल घेत न्यायालयाने शासनाला आदेश दिला की "राज्यातील सर्व शाळांवार समित्या तयार करायला हव्या आणि त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश सदस्य असावेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखालील असलेल्या शाळा बहुसंख्य आहेत. त्या शाळांमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. शाळा बेभरवश्यावर चालू शकत नाहीत. न्यायालयीन मित्र म्हणून स्वतःहून खंडपीठाने वकील रश्मी कुलकर्णी यांची नियुक्ती केली. आणि त्यांना प्रत्येक जिल्ह्याला या संदर्भात समित्या तयार करण्यासंदर्भातील सूचना जारी केली.