मुंबई - हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला वट पौर्णिमा हा सण आज राज्यभर साजरा होत आहे. मात्र, यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. वरळीतील बीडीडी चाळीत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली गेली. या चाळीत राहणाऱ्या पोलीस पत्नींनी इतर महिलांना घरीच वटपौर्णिमा साजरी करावी असे आवाहन केले.
बीडीडी चाळीत कोरोना वारियर्सच्या पत्नींनी घरातच साजरी केली वटपौर्णिमा - बीडीडी चाळ कोरोना वारियर्स
यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. वरळीतील बीडीडी चाळीत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली गेली. या चाळीत राहणाऱ्या पोलीस पत्नींनी इतर महिलांना घरीच वटपौर्णिमा साजरी करावी असे आवाहन केले.
वटपौर्णिमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकाडाऊन घोषीत करण्यात आला. या काळात पोलिसांनी जीवाची बाजी लावत आपले कर्तव्य बजावले. याच पार्श्वभूमीवर बीडीडी चाळीतील पोलीस पत्नींनी घरातच वटपौर्णिमा साजरी केली. तसेच इतर महिलांना देखील घरीच वटपौर्णिमा साजरी करावी, असे आवाहन पोलीस पत्नींनी केले.