मुंबई : महा विकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर या सरकारमध्ये असलेले मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत हे सरकार अशाप्रकारे कोसळल्याची खंत महाराष्ट्राला असल्याचे म्हणले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सर्वांना सोबत घेऊन चालणारे सरकार दिले. या सरकारला राज्याच्या सर्व घटकातील नागरिकांचा भक्कम पाठिंबा होता. हे सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला आहे असे त्यांनी म्हणले आहे.
Ashok Chavan on government : सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला- अशोक चव्हाण - अशोक चव्हाण
महा विकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर या सरकारमध्ये असलेले मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत हे सरकार अशाप्रकारे अकाली कोसळल्याची ( mourns the untimely collapse of the government ) खंत महाराष्ट्राला ( The whole of Maharashtra ) असल्याचे म्हणले आहे.
कोरोनासारखे महाभयंकर संकट ओढवले असतानाही जे-जे चांगले करता आले, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही अडीच वर्षात केला. नवीन सत्ताधाऱ्यांना माझ्या सदिच्छा आहेत आणि आम्ही सुरू केलेल्या लोकहिताच्या कामांमध्ये राजकारण होणार नाही, एवढी माफक अपेक्षा आहे असेही अशोक चव्हाण यांनी म्हणले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना बंडखोर आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत नाराजी असेल तर आपण बाहेरून शिवसेनेला पाठिंबा देऊ अशी इच्छा देखील व्यक्त केली होती.असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्या भावनेचा उल्लेख आपल्या संभाषणातूनही केला होता.