महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

House Rent: शिक्षकांना वाढीव घरभाडे मिळण्याचा मार्ग मोकळा, थेट खात्यात रक्कम होणार जमा - वाढीव घरभाडे मिळण्याचा मार्ग मोकळा

राज्यामध्ये मुंबई आणि कोकण विभागातील सुमारे 40,000 शिक्षक मंडळींना दोन वर्षांपूर्वीच्या वाढीव घर भाड्याची रक्कम मिळालेली नव्हती. दरम्यान, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिल्यामुळे आता हे घर भाडे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

House Rent
House Rent

By

Published : Mar 12, 2023, 3:19 PM IST

मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील आणि राज्य सरकारी कर्मचारी असलेले जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी 27% ची घर भाडे वाढ करण्यात आली होती. मात्र, ही 27 टक्क्यांची वाढ त्यांना प्रत्यक्षात मिळालेली नव्हती. तसेच, शासनाने निर्णय केला होता. त्याबाबतचे आदेशही पारित झाले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. शासनाने याबाबत 24% वरून 27% पर्यंत म्हणजे तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात शिक्षकांच्या पगारात ते जोडलेले नव्हते.

सर्व स्तरावर आता गतिमान हालचाली : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांना जुलै 2021 या वर्षापासून घर भाड्यामध्ये आधी जी 24% होते त्यामध्ये वाढ करून 27% पर्यंत ती वाढ केली गेली होती. परंतु, ही वाढ नोंदवल्यानंतर ती भर वेतनामध्ये दिसली पाहिजे होती. पण वेतनात ते नसल्यामुळे शिक्षकांना घर भाड्याची वाढीव रक्कम मिळत नव्हती. याबाबत जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत वित्त विभाग देखील पुढे काही करू शकत नाही अशी परिस्थिती होती. अखेर, शासनाने निर्णय घेतल्यामुळे सर्व स्तरावर आता गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत.

घर भाडे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार : याबाबत राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही दोन वर्षांपूर्वीची थकीत घरबाकीची रक्कम मिळावी, यासाठी अनेकदा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. शासन निर्णय करत नसेल तर याबाबत आंदोलन करू असा इशारा देखील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला होता. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी आता अशा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वाढीव घर भाडे मिळणार आहे. त्यासाठी आता त्यांनी त्वरित प्रस्ताव नियमानुसार दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. हे प्रस्ताव दाखल झाले म्हणजे त्याला प्रशासकीय मान्यता ताबडतोब घेतली जाईल, आणि दोन वर्षाच्या विलंबाने राज्यातील पालघर रायगड ठाणे मुंबई शहरातील शिक्षकांना हे वाढीव घर भाडे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

महागाईच्या काळामध्ये ही वाढीव घर भाड्याची रक्कम मिळत नव्हती : यासंदर्भात महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, शासनाने 24% वरून 27% पर्यंत घर भाड्यात वाढीचा निर्णय घेतला. हा चांगला निर्णय होता याबद्दल काही वाद नाही. मात्र, तो निर्णय घेतल्यानंतर त्याची नोंद एकूण वेतन रकमेत केली नव्हती. त्यामुळे वेतन मिळत असताना वाढीव घर भाड्याची रक्कम मिळत नव्हती. इकडे महागाई वाढली. खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव वाढले. घरभाडे वाढले. अशा महागाईच्या काळामध्ये ही वाढीव घर भाड्याची रक्कम मिळत नव्हती. आता कुठे शासनाने निर्णय घेतला आहे त्याचे स्वागतच आहे.

हेही वाचा :Rajinikanth on Politics : ...म्हणून राजकारणात उतरलो नाही; रजनीकांत यांचा मोठा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details