मुंबई - अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटीच्या बसेसची सेवा सुरू आहे. ही सेवा अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी कुर्ला आगारातील वाहतूक नियंत्रक निवृत्तीच्या वयातही दररोज 170 किलोमीटरचा प्रवास करून या कोरोना विरोधाच्या युद्धात आपले योगदान देत आहेत.
...म्हणून कुर्ल्याचे वाहतूक नियंत्रक करताहेत रोज 170 किमीचा प्रवास - वाहतूक नियंत्रक
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळून सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. वैद्यकीय विभागातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी सेवा अविरतपणे बजावत आहेत. त्यांच्या वाहतूकीसाठी शहरबससह एस. टी. बसही धावत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाविरोधातील युद्धात लढता यावे, यासाठी बसेस सुरू राहावे, यासाठी कुर्ला येथे कर्तव्यास असलेले वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाघोले हे 170 किमीचा प्रवास करत आहेत.
![...म्हणून कुर्ल्याचे वाहतूक नियंत्रक करताहेत रोज 170 किमीचा प्रवास वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाघोले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7096581-thumbnail-3x2-mum.jpg)
वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाघोले
56 वर्षीय वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाघोले हे कुर्ला आगारात आपली सेवा बजावत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर ते कुर्ला नेहरुनगर असा दूरचा प्रवास दररोज ते दुचाकीने करत आहेत. एसटीची सेवा सुरळीत देण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आपण दररोज इतका प्रवास करू शकतोय, असेही ते म्हणाले. लवकरच हे कोरोनाचे संकट टळेल, अशी आशा वाघोले यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -मुंबईत संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या 11 हजार जणांवर कारवाई