मुंबई - माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी निवृत्तीनंतर लिहलेल्या 'लेट मी से ईट नाऊ' या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याबाबत जिवंत पकडलेला अतिरेकी अजमल कसाबबद्दलही मारिया यांनी मोठा या पुस्तकात केला आहे.
अजमल कसाब ज्या वेळी मुंबईत हल्ल्यासाठी दाखल झाला होता, त्यावेळी त्याच्याकडे हिंदू व्यक्तीचे ओळखपत्र आढळून आले होते. 'समीर चौधरी' नावाचे ओळखपत्र कसाबने स्वत:कडे ठेवले होते. अजमल कसाब पकडला गेल्यानंतर आयएसआय आणि लष्कर ए तोयबा या संघटनांकडून अजमल कसाब याचा काटा काढण्याचा कट रचला गेला होता. मुंबईवर हल्ला करणाऱ्या सर्वच 10 दहशतवाद्यांकडे हिंदू नाव असलेले ओळखपत्र आढळून आले होते. हा हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी केला असल्याचे भासवण्यासाठी ही ओळखपत्रे त्यांच्याकडे देण्यात आल्याचे, राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात लिहले आहे. जर अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला नसता, तर हा हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी केला असल्याचा समज झाला असता.