महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

New Year: सरत्या वर्षाला निरोप अन् नव्या वर्षाचे स्वागत! या मंदिरांमध्ये भाविकांची होते गर्दी

प्रत्येक वर्षीप्रमाणे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताला राज्यात मंदिरांमध्ये काही कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. तसेच, भिविकांची गर्दी पाहता मंदिर व्यवस्थापनाकडून वेळापत्रकात बदलही केले जातात. (New year) तसे, यंदाही मुंबई, शिर्डी, कोल्हापूर, शेगाव या शहरांसह इतर शहरातही काही नियमावरी तयार करण्यात आली आहे. तसेच, भाविकांसाठी मंदिरही जास्तवेळ खुले ठेवले जाणार आहेत.

New yea
सरत्या वर्षाला निरोप अन् नव्या वर्षाच्या स्वागताला हे मंदिर असणार खुले

By

Published : Dec 29, 2022, 10:16 PM IST

Updated : Dec 31, 2022, 9:24 AM IST

मुंबई - यंदा भाविकांना नववर्षात श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन क्यू आर कोड शिवाय दिले जाणार आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. (Temples in the state will remain open on New Year) भाविकांची गर्दी वाढण्याची लक्षात घेऊन रांगेची विशेष व्यवस्था केली गेली असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आव्हान श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने केले आहे.

येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मुंबईतूनच नाहीत तर राज्यातून, राज्याच्या बाहेरून सुद्धा भाविक नवीन वर्षाला श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावतात. यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांसाठी आराध्य दैवत आहे. मुंबईतील कानाकोपऱ्यातील हजारो भाविक दररोज श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. त्या सोबतच नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी ही अनेक भाविकांची इच्छा असते. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. अशावेळी भाविकांची गर्दी होते.

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झाली आहे. यानिमित्‍ताने शनिवार दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. अशी माहिती संस्‍थानचे प्रमुख मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

व्यवस्था - दरवर्षी नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या येणा-या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात १० हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा व भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) या ठिकाणी २८ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. साईभक्‍तांकरीता सुमारे ३५० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात आलेले आहे. उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे, यासाठी श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, गेट नंबर ०५, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे.

कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वजण नवीन वर्षाची सुरुवात करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाने करत असतात. यावर्षी सुद्धा अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने त्याचीही विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता असून, मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. त्यानुसार मंदिराबाहेर भक्तांच्या ज्या ठिकाणी रांगा लागतात तिथे मंडप व्यवस्थाही करण्यात आली आहे.

निर्बंध मुक्तच - यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता - दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन्ही वर्षात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. शिवाय प्रत्येक भक्तांना ई पास द्वारेच दर्शन दिले जात होते. सॅनिटायझर चा वापर करूनच मंदिरात सोडले जात होते. शिवाय ठराविक वेळासाठी मंदिर सुरू होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने त्याची सुद्धा काळजी घेण्यात येत आहे. मात्र निर्बंध मुक्तच सद्या भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापूरात येण्याची शक्यता आहे. मात्र तरीही भक्तांनी सुद्धा कोरोनाचे जे काही नियम आहेत ते स्वतः पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.

मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती - दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने पुन्हा एकदा अनेक निर्बंध काही ठिकाणी सुरू आहेत. कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात सुद्धा कर्मचाऱ्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याला विना मास्क मंदिरात येण्यास निर्बंध घालण्यात आले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

बुलढाणा (शेगाव) - विक एन्ड आणि नाताळच्या सुट्या, तसेच, नवं वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण तीर्थक्षेत्राला जाणे पसंद करतात. शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीच दर्शन घेण्यासाठीही दरवर्षी मोठी गर्दी बघायला मिळते. तर, नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो, ही प्रार्थना आणि नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन याठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात. मंदिराची वेळ सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असते.

मंदिर प्रशासन - याठिकाणी आगामी कोरोना लाटेच्या शक्यतेने संत गजानन महाराज मंदिर प्रशासनाने अजून तरी कुठलेही निर्णय घेतले नाहीत. मात्र, दर्शनासाठी येणारे भाविक मात्र स्वतः खबरदारी घेतानाच चित्र आहे. अनेक भाविक हे मास्क वापरत असून कोरोना नियमांचे पालन करतानाही दिसत आहेत. कोरोना पुन्हा उंबरठ्यावर जरी असला या आठवड्यात लाखो भाविक शेगावात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंदिर प्रशासन आगामी काळात काही निर्णय घेत का..? याकडे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर मोठ्या मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.

Last Updated : Dec 31, 2022, 9:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details