मुंबई :ठाणे जिल्ह्यामधून पालघर जिल्हा (1 ऑगस्ट 2014)रोजी स्वतंत्र झाला त्या बाबीला आता आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही जिल्हा स्वतंत्र झाला तरी अनेक शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर कर्मचारी यांच्या समायोजनाचा मुद्दा तसाच रेंगाळत राहिला आहे. या मुद्द्यावर पर्याय म्हणून ग्रामविकास विभागाने त्या संदर्भात ग्राम विकास विभागाने (दि. 29 फेब्रुवारी 2016-22 जुलै 2016)च्या शासन निर्णयाद्वारे निर्णय घेतला होता.
अजूनही वर्ग केलेले नाही : या घडामोडीनंतर उच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका दाखल झाली आणि (2017)मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निकाल दिला गेला. परंतु जिल्ह्यातील शिक्षकांची पदे विचारात घेऊन पालघर जिल्ह्यामध्ये विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवा आहेत. त्या ठाणे जिल्ह्याकडे अजूनही वर्ग केलेल्या नाहीत. त्यामुळे असे शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्याबाबत वाट पाहत आहेत.
प्रतिज्ञापत्र देखील दाखल : राज्याच्या शाळा मधील शिक्षकांचे जेवढे पद रिक्त आहेत त्याबाबत उच्च न्यायालयामुळे सुमोटो जनहित याचिका दाखल केली होती. आणि त्यावर प्राथमिक शिक्षण संचालक यांच्याकडून प्रतिज्ञापत्र देखील दाखल झाले आहे. मग त्यामध्ये पवित्र प्रणाली मार्फत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची पदे भरणे प्रस्तावित आहे.
शिक्षकांच्या सेवा वर्ग करण्याची मागणी : याचा परिणाम पाहता (2017 ते 2022)या पाच वर्षाच्या काळात संगणक पद्धतीने ज्या प्रक्रिया पार पडल्या व जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदल्या झाल्या. त्याच धर्तीवर पालघर जिल्हा परिषदेमध्ये विकल्पाच्या विपरीत कार्यरत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवा ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी देखील केलेली आहे.