मुंबई - परळ परिसरातील शाळेच्या निलंबित वरिष्ठ लिपीकाने शाळा प्रशासनाला आपल्यावर लावलेले आरोप मागे घ्या, अन्याथा मी माझ्याकडील शाळेची महत्वाची माहिती सार्वजनिक करेल, अशी धमकी दिली आहे. दरम्यान, येथील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निलंबित लिपिकाची शाळा प्रशासनाला धमकी, प्रशासनाकडून तक्रार दाखल - भाईवाडा मुंबई
परळ परिसरातील शाळेच्या निलंबित वरिष्ठ लिपीकाने शाळा प्रशासनाला आपल्यावर लावलेले आरोप मागे घ्या, अन्याथा मी माझ्याकडील शाळेची महत्वाची माहिती सार्वजनिक करेल, अशी धमकी दिली आहे.
महिलेने तक्रार केल्यानंतर केले होते निलंबित
येथील एका कनिष्ठ लिपिक महिलेने तक्रार केल्यानंतर या लिपीकास निलंबित करण्यात आले होते. मात्र, यानंतर याच व्यक्तीने शाळेच्या प्रशासनाला एका मेलद्वारे धमकी दिली आहे. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घेतले नाही, तर आपण शाळेचा महत्त्वाचा डेटा लीक करून शाळेला नुकसान पोहचवू, अशी धमकी दिली होती. यानंतर या शाळेच्या प्रशासनाने याची दखल घेत, त्याच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणी अद्याप संबंधीत व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही.