मुंबई: केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी दर कमी केल्यामुळे पेट्रोलचे दर जवळपास साडेनऊ रुपयांनी तर डिझेलचे सात रुपयांनी कमी झाले. त्यानंतर सर्वस्तरातून राज्य सरकारने देखील व्हॅट कमी करावा अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने आज इंधनाच्या दरात कमी केली आहे. त्यामुळे नागरिकांना इंधनाच्या दरात आनखी दिलासा मिळणार आहे.
Reduced Vat Of Fuel : राज्य सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी - Central Government
केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने (The state government) आज 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट म्हणजे मूल्यवर्धित करात (Vat) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटरची कपात (reduced Vat of fuel) केली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये भार पडणार आहे.
![Reduced Vat Of Fuel : राज्य सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी Petrol Disel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15357158-143-15357158-1653228601667.jpg)
पेट्रोल डिझेल
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पंन कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.
हेही वाचा : Cut In Excise Duty : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 तर डिझेलवर 6 रुपयांची कपात
Last Updated : May 22, 2022, 8:01 PM IST