महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईकरांना दिलासा..! दुप्पट ते पाचपट पाणीपट्टी दरवाढ स्थायी समितीने रोखली

प्रत्येक मुंबईकराला महापालिकेकडून १५० लिटर पाणी पुरवठा होतो. १५० लिटरपेक्षा अधिक वापर करणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट ते पाचपट बिल वसूल केले जाणार होते. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिका दरवर्षी पाच ते आठ टक्के पाणी पट्टीत वाढ करत असताना पुन्हा अशा प्रकारे पाणी पट्टीत वाढ करण्यास भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी विरोध केला. कोरोना काळात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या असता अशी दरवाढ करणे योग्य नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

By

Published : Oct 29, 2020, 8:26 PM IST

मुंबई- इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट ते पाचपट पाणीपट्टी वसूल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या मुंबईकरांवर करवाढ लादू नये, अशी मागणी लावून धरत सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे, हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

माहिती देताना भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, विरोधी पक्ष नेते रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

मुंबई महापालिका आपल्या सात धरणातून दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करते. प्रत्येक मुंबईकराला महापालिकेकडून १५० लिटर पाणी पुरवठा होतो. १५० लिटरपेक्षा अधिक वापर करणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट ते पाचपट बिल वसूल केले जाणार होते. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिका दरवर्षी पाच ते आठ टक्के पाणी पट्टीत वाढ करत असताना पुन्हा अशा प्रकारे पाणी पट्टीत वाढ करण्यास भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी विरोध केला. कोरोना काळात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या असता अशी दरवाढ करणे योग्य नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कोरोना दरम्यान नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले

कोरोना दरम्यान नागरिकांचे आर्थिक गणित बिघडल्याने दरवाढ करू नये, अशी मागणी करत हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. याला सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने पाणीपट्टी वाढीचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

का आणण्यात आला प्रस्ताव

पाणी पुरवठ्याच्या राष्ट्रीय प्रमाणकानुसार प्रती व्यक्ती दररोज १५० लिटर इतका पाणी वापर हवा. परंतु, मुंबईत अनेक इमारतींमध्ये दररोज दरोडोई पाणी वापर हा १५० लिटरपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे, या जास्तीच्या पाण्याला दुरेक्ष दर पद्धतीनुसार जास्त दर लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणला होता. तसेच, ओसी नसलेल्या इमारतींमध्येही पुरवठा होणाऱ्या पाणी दरातही याचप्रमाणे वाढ केली जाणार होती.

किती होणार होती दरवाढ

सध्या दरडोई १५० लिटर पाणी वापरणाऱ्यांना १ हजार लिटरसाठी ५.२२ रुपये दर आहे. तर, १५० ते २०० लिटर पाणी वापरणाऱ्यांसाठी १०.४४ रुपये इतका दर आहे. ज्याचा प्रस्तावित दर १०.४४ रुपये इतका होता. तर, २०० ते २५० लिटरकरिता १५.६६ वरून २६.१० रुपये इतका आणि २५० हून अधिक लिटरकरिता २०.८८ वरून ३१.३२ रुपये इतका दर प्रस्तावित होता. परंतु, स्थायी समितीत हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने ही दरवाढ होणार नाही.

यंदा ८ टक्के दरवाढ नाही

मुंबईकरांना महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. पाणी बिलाच्या रक्कमेत दरवर्षी ८ टक्के दरवाढ केली जावी, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अशी दरवाढ दरवर्षी केली जाते. यावर्षी कोरोनाची परिस्थिती असल्याने ही दरवाढ करण्यात येणार नसल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा-अतिरिक्त प्रमाणात बातम्या प्रसारित केल्यामुळे न्यायाला अडथळा येऊ शकतो का? उच्च न्यायालयाचा केंद्राला प्रश्न

ABOUT THE AUTHOR

...view details