मुंबई:मुंबईत शनिवारी ३३० नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत ( Mumbai Corona Update ). आज १९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६४ हजार ६०३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४३ हजार १०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९२९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३१३८ दिवस इतका आहे.
मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२२ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३३० रुग्णांपैकी ३१० म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४७२ बेड्स असून त्यापैकी ६८ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.