महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवघ्या नऊ महिन्यांत अंधेरी रेल्वे स्थानकाच्या स्कायवाॅकचे काम पूर्ण - andheri station Skywalk news

पश्चिम रेल्वेने कोरोना संकटकाळात अंधेरी रेल्वे स्थानकात चर्चगेट दिशेकडील नवीन स्कायवाॅकचे काम अवघ्या नऊ महिन्यांत पूर्ण केले आहे. नवीन स्कायवाॅक 110 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद आहे.

Skywalk construction andheri station
स्कायवॉक बांधकाम अंधेरी रेल्वेस्थानक

By

Published : Apr 3, 2021, 3:50 PM IST

मुंबई - पश्चिम रेल्वेने कोरोना संकटकाळात अंधेरी रेल्वे स्थानकात चर्चगेट दिशेकडील नवीन स्कायवाॅकचे काम अवघ्या नऊ महिन्यांत पूर्ण केले आहे. नवीन स्कायवाॅक 110 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद आहे. 1 जुलै 2020 पासून या पुलाच्या कामाला सुरूवात झाली होती, तर 31 मार्च 2021 या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

हेही वाचा -नागरिकांनी शिस्त पाळावी, सरकारने लॉक डाऊन करू नये; प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांना विनंती

6 कोटी 50 लाख रुपये खर्च -

अंधेरी स्थानकाच्या चर्चगेट दिशेकडील फलाट क्रमांक 6/7 आणि 8/9 वरून पायऱ्यांनी स्कायवाॅक जोडला गेला आहे, त्यामुळे प्रवाशांना येथून प्रवास करण्यास सुरक्षित आणि लाभदायी होणार आहे. स्कायवाॅक उभारण्यासाठी सुमारे 6 कोटी 50 लाख रुपये खर्च लागला. लाॅकडाऊन काळात पश्चिम रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल उभारण्यासाठी काम केले, त्यामुळे नऊ महिन्यांच्या कालावधीत स्कायवाॅकचे काम पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

आतापर्यंत 14 पादचारी पूल उभारले -

कोरोना सारख्या संकटकाळात प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेद्वारे 2020-21 या कालावधीत एकूण 14 पादचारी पूल आणि दोन स्कायवाॅक उभारण्यात आले. लॉकडाऊनचा फायदा घेत प्रवास सुरक्षित आणि सुविधाजनक होण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे पादचारी पूल, उन्नत मार्ग, सरकते जिने यांचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा -सचिन वाझे प्रकरण : 'ती' महिला हॉटेल ट्रायडेंट मधलीच, सूत्रांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details