महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2023, 8:25 PM IST

ETV Bharat / state

Shivshahi Bus Mumbai : शिवनेरीसह मुंबई-सातारा, बोरिवली-सातारा या मार्गावरून धावणाऱ्या शिवशाही बस एक्सप्रेस हायवे वरूनच धावणार

2 जानेवारी रोजी एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बस ह्या एक्स्प्रेस हायवेवरून (Express Highway) नाही तर जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून धावणार, तसा उपमहाव्यवस्थापक यांचा आदेश होता. त्यांच्या आदेश पत्रआधारे माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक यांच्या मते जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून त्यांनी खुलासा जारी केला आहे. राज्यातील एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक्स्प्रेस हायवे ऐवजी काही बस गाड्या मुंबई पुणे जुन्या हायवे (Mumbai Pune Highway) मार्गावरून चालवल्या जातील असे आदेश पत्र 2 जानेवारी रोजीच जारी केले होते. ह्या आदेशानुसार प्रति एसटी (Shivshahi Bus Mumbai) प्रति फेरी मुंबई-पुणे जुन्या हायवेवरून गाड्या नेल्यास एका बसमागे एका फेरीला 190 रुपये वाचतात. यातून उत्पन्न वाढेल असा महामंडळाचा कयास आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. (Latest news from Mumbai)

Shivshahi Bus Mumbai
शिवशाही बस

मुंबई :राज्याचे एसटी महामंडळ (ST Corporation) तोट्यात असताना एसटी महामंडळाला भरघोस कमाईची संधी आहे. तरी देखील एसटी महामंडळ प्रवाशांची सोय न पाहता किंवा त्यांच्या मनात विचार येईल त्या पद्धतीने अंमल करण्याचा प्रयत्न करत आहे. (Express Highway) यामुळे उत्पन्न कसे वाढणार हा प्रश्न नवीन आदेशामुळे उपस्थित होतो. (Mumbai Pune Highway) काल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एस टी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक यांनी हा आदेश जारी केलेला होता. (Shivshahi Bus Mumbai)

बचतीमुळे एसटी महामंडळ फायद्यात :पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हुबळी, बंगलोर, मंगलोर सर्व गाड्या जुन्या मार्गे गेल्या पाहिजे असे प्रशासनाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. जुन्या मुंबई पुणे हायवे परतीच्या प्रवासासाठीसाठी एका बसला रुपये 485 रुपये टोल द्यावा लागतो. तर नवीन एक्सप्रेस वे ना जाण्यासाठी त्याच बसला रुपये 675 टोल जाऊन येऊन द्यावा लागतो. एका बसमागे एका फेरीला 190 रुपये वाचतात. ह्या बचतीमुळे एसटी महामंडळ फायद्यात येईल, असे महामंडळाचे म्हणणे आहे. असे नाव न सांगण्याच्या अटीवर काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या कारणामुळे घेतला निर्णय :लोणावळ्याला शनिवार- रविवार मोठ्या संख्येने प्रवासी व पर्यटक जात असतात. शिवाय इतर दिवशी ही मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक प्रवास करत असतात. मात्र परस्पर एक्सप्रेस हायवेने पसार होणाऱ्या एसटीच्या बसेसमुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनांनी जावे लागते. यातून मार्ग काढण्याच्या उद्देशाने प्रशासनाने तसा निर्णय घेतला असल्याचे कालच्या आदेशात म्हटले आहे.

उपमहाव्यवस्थापकाचे स्पष्टीकरण :आज मात्र महामंडळ उपमहाव्यवस्थापक यांनी आज सायंकाळी जारी केलेल्या नमूद केले आहे की ,"प्रसार माध्यमातील बातम्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून शिवशाही आणि शिवनेरीसह मुंबई ते सातारा आणि बोरिवली ते साताराकडे जाणाऱ्या एसटी बस ह्या एक्सप्रेस जलदगती मार्गावरून जातील."

ABOUT THE AUTHOR

...view details