मुंबई: मुंबईच्या बाबूलनाथ येथे सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे मंदिर बाराव्या शतकात बांधण्याची माहिती उपलब्ध आहे. १७८० मध्ये याचे अवशेष मिळाल्यानंतर या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्याच्या नंतर सर्वच मंदिरे बंद करण्यात आली. बाबुलनाथ येथील हे मंदिर सुद्धा बंद करण्यात आले होते. कोरोनाच्या प्रसार कमी झाल्याच्या नंतर सर्व मंदिरे उघडण्यात आली. मंदिरामध्ये अभिषेक व पूजा अर्चा सुरू करण्यात आली.
आयआयटी कडून सर्व्हेक्षण:प्राचीन काळापासून मंदिरात दुधाचा तसेच इतर अभिषेक बंद करण्यात आला आहे. त्यानंतरही शिवलिंग खराब होत असल्याचे पुजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्थानी आयआयटी मुंबईकडून शिवलिंगाचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आयआयटीकडून सर्व्हेक्षण सुरू असून लवकरच त्याचा अहवाल मंदिर प्रशासनाला दिला जाणार आहे. कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे.
अभिषेक करण्यास बंदी : आठ ते दहा महिन्यांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत आहे. असे मंदिराच्या पुजाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यानंतर मंदिर ट्रस्टने आयआयटी बॉम्बेकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयआयटीने शिवलिंगाला भेग गेल्याचे म्हटले आहे. यामुळे आता या शिवलिंगावर अभिषेक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बाबुलनाथ मंदिरावर भाविकांची श्रद्धा आहे. शिवलिंगाबाबत संवेदनशील आहोत, ते जतन करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातील अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.