मुंबईMLA Disqualification :शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी आज निर्णय येणार आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्णय आमच्याच बाजूने येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. (Rahul Narvekar) येणारा जो निकाल आहे तो आमच्या बाजूने लागणार असून सर सलामत आहे आणि पगडी पण हजार राहणार आहे. तसंच पेपर फुटी संदर्भात बोलताना पाटील म्हणाले की पेपर वारंवार फुटणे ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो. जो कोणी दोषी असेल त्यावर सरकारने निश्चितपणे कारवाई केली पाहिजे. सरकार कारवाई करणार असा ठाम विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. (MLA Eligibility Decision)
सत्याचा विजय होईल केसरकर :राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मंत्री दीपक केसकर यावेळी म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठक आणि आमदार अपात्रतेचा निर्णय याचा कुठलाही संबंध नाही. राज्य मंत्रिमंडळ बैठक दर आठवड्याला होत असते. कुपोषित बालकांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बालविकास केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सगळ्यांना आजच्या निकालाची उत्कंठा असेलच शेवटी सत्तेचा विजय होत असतो, त्यामुळे नेहमीच रडीचा डाव खेळायचा याला कुठेतरी पायबंद बसेल असं आपल्याला वाटत असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.