मुंबई -येथील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्स या दुकानात घुसत शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी या दुकानाचे नाव बदला, असा इशारा दुकानमालकाला दिला होता. मात्र, शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनीच नितीन नांदगावकरांच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत अशा प्रकारची आता मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले आहे. याचबरोबर ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे देखील राऊत यांनी ट्विट करत सांगितले आहे. यामुळे कराची बेकरीचे नाव बदलण्याच्या मुद्यावरून आता नांदगावकर बॅक फूटवर गेले आहेत. आता नांदगावकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'कराची स्वीट्स'चे नाव बदलण्याचे प्रकरण : ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही - संजय राऊत - कराची बेकरी बातमी
वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्स या दुकानात घुसत शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी या दुकानाचे नाव बदला, असा इशारा दुकान मालकाला दिला होता. मात्र, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत
संजय निरुपम यांचादेखील आक्षेप
भारतात आणि मुंबईत जे चायनीज दुकान आहेत त्यांचा आणि चीनचा ज्या प्रकारे संबंध नाही त्याच प्रकारे वांद्रे येथील कराची स्वीटचा देखील पाकिस्तानशी काही संबंध नाही. हे दुकान 70 वर्षे जुने आहे. शिवसैनिकांनी सुरू केलेला तमाशा बंद केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शांत न राहता या प्रकरणात लक्ष दिले पाहिजे व पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजावले पाहिजे, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितले.