मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा 5 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे. विदर्भातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पाच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर आता फक्त देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची 5 वर्षे पूर्ण केली आहेत. हे महाराष्ट्राचे भाग्य आहे, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कधीच विभाजन होऊ देणार नाहीत, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष विजय औटींनी विधानसभेतील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला - विजय औटी - स्वतंत्र विदर्भा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे.
यावेळी औटी म्हणाले, स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आता संपला आहे. उपाध्यक्षपदासाठी कमी कालावधी मिळाला तरी कमी कालावधीत किती लोकांना न्याय दिला हे महत्त्वाचे आहे. कोणाला न्याय दिला नाही, तर कोणावर अन्याय होऊ दिला नाही, ही भावना लोकशाहीच्या पवित्र सभागृहात बसून काम करताना ठेवली.
विधानसभेत औटींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, औटींना तसा कमी कालावधी मिळाला. कमी कालावधीत त्यांनी चांगले काम केले. अभ्यासूपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आईवडील कट्टर कम्युनिस्ट असूनही कॉंग्रेस- समाजवादी असा प्रवास करुन औटी शिवसेनेत आले. पारनेर तालुक्यातील वीज, सिंचन, रस्त्याचे काम करुन लोकांचा औटी यांनी लोकांचा विश्वास मिळवला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.