मुंबई:चाचा नेहरूंच्या (Pandit Jawaharlal Nehru) वाढदिवशी राष्ट्रीय बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरू (pandit jawaharlal nehru birth anniversary) यांना लहान मुलांबद्दल नेहमीच लळा होता आणि त्यामुळे त्यांची जयंती बालदिन (Children's Day) म्हणून साजरी केली जाते. त्यादिवशी लहान मुलांसोबतच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने अथर्व फाऊंडेशन आणि ऑल प्ले प्रॉडक्शनतर्फे 'ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय' (All Play a Carnival of Joy) आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजकारणी, राजनीतीज्ञ, मनोरंजनसृष्टीतील कलाकार, विदेशी राजदूत आदींनी आवर्जून हजेरी लावली होती. त्यावेळी ‘ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय’ ची रंगतदार प्रस्तुति करण्यात आली.
'ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय'च्या मंचावर अरुण नलावडे आणि गोपाळ शेट्टी यांची उपस्थिती! - pandit jawaharlal nehru birth anniversary
चाचा नेहरूंच्या (Pandit Jawaharlal Nehru) वाढदिवशी राष्ट्रीय बालदिन साजरा केला (pandit jawaharlal nehru birth anniversary) जातो. पंडित नेहरू यांना लहान मुलांबद्दल नेहमीच लळा होता आणि त्यामुळे त्यांची जयंती बालदिन (Children's Day) म्हणून साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने अथर्व फाऊंडेशन आणि ऑल प्ले प्रॉडक्शनतर्फे 'ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय' (All Play a Carnival of Joy) आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण:प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे रंगलेल्या या कार्यक्रमात बोरिवलीतील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नाटक, कविता आणि स्किट्स करण्याची संधी मिळाली होती आणि त्यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रमुख पाहुणे गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) - खासदार उत्तर मुंबई, सतींदर एस. आहुजा -माननीय काउंसिल जॉर्जिया, अरुण नलावडे - मनोरंजनक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, वर्षा राणे - ट्रस्टी अथर्व फाउंडेशन आणि सुनील राणे - आमदार बोरिवली उपस्थित होते. ऑल प्ले कार्निव्हलमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी बोरिवलीतील विविध शाळांमधील मुलांनी केलेली विविध स्किट्स, बॉलीवूड गाणी आणि कविता सादरीकरणाला दाद दिली. शिवाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित नाट्यमय सादरीकरण आणि वर्षा राणे दिग्दर्शित द्वारका प्रसाद माहेश्वरी लिखित वीर तुम बढ़े चलो या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.
ऑल प्ले कार्निव्हल सारखे उपक्रम: यावेळी बोलताना सुनील राणे म्हणाले की, अथर्व फाऊंडेशनने आयोजित केलेला 'ऑल प्ले कार्निव्हल' हा बोरिवलीतील स्थानिक लोकांसाठी आजूबाजूच्या मुलांसमोर त्यांचे कलागुण दाखविण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. आणि अश्या प्रकल्पामुळे अनेकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळते. गोपाळ शेट्टी यांनी मुलांचे तोंड भरून कौतुक केले आणि ऑल प्ले कार्निव्हल सारखे उपक्रम इतर ठिकाणीही राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे (Arun Nalavade) म्हणाले की, मुलांमधील स्टेजवर परफॉर्म करण्याची भीती लहानपणीच घालविली पाहिजे जेणेकरून भविष्यात त्यातूनच मनोरंजनसृष्टीला कलाकार मिळू शकतील.