महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दत्तक दिलेला मुलगा परत मिळविण्यासाठी जन्मदात्याची न्यायालयात धाव, याचिका फेटाळली

दत्तक दिलेल्या मुलागा पुन्हा मिळावा यासाठी जन्मदात्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळली आहे.

court
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 3, 2021, 3:22 PM IST

Updated : Mar 3, 2021, 4:50 PM IST

मुंबई -दत्तक दिलेला मुलगा पुन्हा मिळण्यासाठी जन्मदात्या पालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले होती. न्यायलयाने ती याचिका फेटाळली आहे.

माहिती देताना प्रतिनिधी

मुलाची 'नाळ' आता दत्तक आईवडलांशी घट्ट जोडली गेल्याने तो त्यांच्याकडेच राहणे योग्य आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडपीठाने जन्मदात्या आई-वडिलांची आपले मूल परत मिळवण्यासाठीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

एका लहान बाळाला त्याच्या आई-वडिलांनी एका जोडप्याला दत्तक दिले होते. त्यानंतर ते मुलगा सहा वर्षे त्याच्या दत्तक पालकांकडेच असून आता भावनिकरित्या त्यांच्याशी जोडले गेले आहे. त्यामुळे आता त्याला त्या वातावरणातून बाहेर काढणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच जन्मदाते वडील हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत. त्यांच्या विवाहबाह्य संबंधातून या मुलाचा जन्म झाला आणि त्यांना पहिल्या पत्नीपासून आधीच दोन मुली आहेत. तर दत्तक वडील हे व्यापारी असून मुलाची दत्तक आई ही डॉक्टर आहे.

दत्तक पालकांना स्वत:चे बाळ नाही. त्यांनी या मुलाचे आजवर स्वत:च्या मुलासारखेच पालनपोषण केले आहे. याशिवाय दत्तक घरात मुलाचे संगोपन अत्यंत योग्य प्रकारे सुरू आहे. मुलगा त्याच्या दत्तक आई-वडिलांबरोबर मानसिक व भावनिकरित्या एकरूप झाला आहे. हे दाम्पत्य पालक म्हणून त्याची योग्य ती काळजी घेत आहेत.

मुलाचे वडील रिक्षा चालक आहेत. त्यांच्या विवाहबाह्य सबंधातून या मुलाचा जन्म झाला होता. त्यामुळे जन्माला आल्यावर दुसऱ्याच दिवशी ते रुग्णालयातून बाहेर पडले. या मुलाला जगासमोर आणू शकत नाही म्हणून त्याच दिवशी त्यांनी या मुलाला दत्तक दिले होते. मात्र, काही वर्षांनी मुलाचे जन्मदाते आई-वडिल एकत्र राहायचे ठरवले. दरम्यान, त्यांना एक मुलगीही झाली. संपूर्ण कुटुंब एक झाल्यामुळे त्यांनी हा दत्तक दिलेला मुलगा पुन्हा मिळविण्यासाठी नागपूर कुटुंब न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, हा दावा न्यायालयाने नामंजूर केला.

हेही वाचा -जळगाव वसतीगृहात पोलिसांनी मुलींना कपडे काढून नाचायला सांगितले, विधानसभेत गाजला मुद्दा

Last Updated : Mar 3, 2021, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details