महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काझीकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, 'एनआयए'ला संशय - सचिन वाझे बातमी

सचिन वाझे आणि रियाजुद्दीन काझी 6 मार्चला एका ऑडी गाडीतून नागपाडा परिसरात गेले होते. 4 तारखेला मनसुखची हत्या करण्यात आली आणि त्यांनतर 6 तारखेला वाझे आणि काझीने नागपाडा परिसरात एका व्यक्तीची भेट घेतली व त्याच्याकडून एक बाटली पेट्रोल आणि हाथोडी घेतली होती. त्या हाथोडीचा वापर डिव्हिआर आणि इतर साहित्याची तोडफोड करण्यासाठी झाला असावा, असा संशय एनआयएला आहे.

काझी
काझी

By

Published : Apr 12, 2021, 7:13 PM IST

मुंबई -मनसुख हिरेन हत्या आणि अ‌ॅंटिलियाबाहेरील कार स्फोटके प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा तपास एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) करत आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. रियाजुद्दीन काझी हा दुसराा आरोपी असून यापूर्वी सचिन वाझे यास अटक करण्यात आली होती. तपासात आणि चौकशीत ज्या बाबी समोर येत आहेत त्याची चौकशी एनआयएकडून केली जात आहे.

सचिन वाझे आणि रियाजुद्दीन काझी 6 मार्चला एका ऑडी गाडीतून नागपाडा परिसरात गेले होते. 4 तारखेला मनसुखची हत्या करण्यात आली आणि त्यांनतर 6 तारखेला वाझे आणि काझीने नागपाडा परिसरात एका व्यक्तीची भेट घेतली व त्याच्याकडून एक बाटली पेट्रोल आणि हाथोडी घेतली होती. एनआयएच्या तपासादरम्यान एनआयएने ताब्यात घेतलेल्या एका मर्सिडीजमधून एक पेट्रोलची बाटली सापडली होती तर एका वोल्वो गाडीतून हाथोडी जप्त करण्यात आली होती. नागपाडा परिसरातून त्या व्यक्तीकडून घेतलेल्या या हाथोडीचा वापर डिव्हिआर आणि इतर साहित्याची तोडफोड करण्यासाठी झाला असावा, असा एनआयएला संशय आहे. नागपाडा परिसरातील ज्या व्यक्तीकडून हे साहित्य वाझे आणि काझीने घेतले होते, त्याचाही जबाब एनआयएने नोंदवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details