मुंबई :स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलगी स्वर सोनी चैनलच्या वतीने वेब सिरीज तयार करण्यात येत आहे. तेलगीच्या मुलीची या वेब सिरीजवर तात्पुरती बंदी आणावी याकरिता केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. न्यायाधीश आर के काहिरसागर यांनी निर्णय दिला होता. त्यानंतर या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेण्यात येणार. पूर्वी दोन्हीही पक्षकारांना सविस्तर उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून उत्तर दाखल करण्यात आले असून आता 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
मागणी फेटाळून लावली :तेलगी यांच्या मुलीने दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, ज्या पुस्तकाच्या आधारे वर वेब सिरीज बनत आहे. त्या पुस्तकावरील अनेक माहिती चुकीची आहे. जर ही वेब सिरीज प्रदर्शित झाली तर कुटुंब यांची मोठी बदनामी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या याचिकेवर पूर्ण सुनावणी होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रतिवाद्यांना या वेब सिरीजवर जाहिरात आणि इतर कोणत्याही कामावर बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
वेब सिरीज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भवऱ्यात : बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी हिने त्याच्या जीवनावर आधारित वेब सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्टॅम्प पेपर घोटाळा 2003 मधील मुख्य दोषी आरोपी अब्दुल करीम लाला यांच्या संबंधित येणाऱ्या वेब सिरीज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या वेब सिरीजच्या प्रदर्शनापूर्वी मुख्य आरोपी तेलगीच्या कुटुंबीयांची परवानगी घेण्यात आली नाही. असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे या वेब सिरीजला प्रदर्शित करण्यापासून थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रमुख प्रकरणातील आरोपी तेलगीच्या कुटुंबीयांनी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात अॅपलॉज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हंसल मेहता, सरव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लिव्ह यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे.
प्रतिष्ठेचे नुकसान होईल :सना इरफान तालिकोटी आरोप केला आहे की, कादंबरीवर आधारित आमच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेचे चित्रण खोटे, निराधार, अपमानास्पद, आक्षेपार्ह, अप्रिय, अत्यंत बदनामीकारक आहे. आमची, आमच्या कुटुंबाची आणि आमच्या मृत वडिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल असे म्हटले आहे. याचिककर्ती सना इरफान तालिकोटी पुढे म्हणाली की, वेब सीरिजमुळे तिच्या अल्पवयीन मुलांचेही नुकसान होईल. तिने सांगितले की तिच्या वडिलांनी अनेक सामाजिक कारणांसाठी बराच वेळ, पैसा खर्च केला होता. पाण्याच्या टाक्या, बोअरवेल, मंदिरे आणि मशिदी बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यांनी अनेक गरीब मुलांचे शैक्षणिक कर्ज देखील केले होते असे म्हटले आहे.