मुंबई - अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ आणखीन वाढले आहे. त्यात या प्रकरणाचा तपास तीन गाड्यांभोवती फिरत असल्याचेही दिसून येत आहे. पहिल्यादा स्कॉर्पीओ त्यानंतर इनोव्हा आणि आता मर्सडीज कारची या प्रकरणात इंन्ट्री झाली आहे. त्यामुळे या सर्व गाड्या प्रकरणाचे गुढ उकलण्यास मदत करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंबानींच्या घरा बाहेर सापडली स्कॉर्पिओ
24 आणि 25 फेब्रुवारीच्या रात्री मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्क जंक्शनजवळ एक स्कॉर्पियो थांबली होती. मध्यरात्री पावणे दोन वाजता त्याच ठिकाणी एक पांढरी इनोव्हा आली आणि या दोन्ही गाड्या पुढे मुकेश अंबानी यांच्या निवसस्थानाच्या दिशेने गेल्या. स्कॉर्पिओ अंबानी यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आली. तर बरोबरची पांढरी इनोव्हा मुलुंड टोलनाका पार करून ठाण्याच्या दिशेने गेली आणि नंतर गायब झाली. यासर्व बाबी सीसीटीव्हीतून स्पष्ट झाल्या. पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटके सापडली आणि नंतर तपासीची चक्रे फिरू लागली. सुरूवातीला या गाडीच्या मालकाचा शोध घेण्यात आला. त्यानुसार ही गाडी मनसुख हिरेन यांची असल्याचे समजले. मात्र, आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी यापूर्वीच केली होती. मुळात ही गाडी सॅम न्यूटन या व्यक्ती असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले होते. न्यूटन यांनी पैसे थकवल्या कारणाने हिरेन यांनी ही गाडी आपल्याच ताब्यात ठेवली होती.
हेही वाचा-अँटिलिया प्रकरण: एनआयएकडून आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांना आज होवू शकते अटक
स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची असल्याने त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. त्यातच त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण वेगळ्याच वळणावर गेले. तपास एनआयएकडे गेला. हिरेन यांच्या पत्नीने काही धक्कादायक माहिती पोलीसांना दिली. गेल्या काही महिन्यापासून संबधित स्कॉर्पिओ ही सचिन वाझेच वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. ही गाडी त्यामुळे हिरेन हत्या आणि अँटिलिया प्रकरणात थेट सचिन वाझे यांचे नाव घेतले जावू लागले. शिवाय ही स्कॉर्पिओ ते ठाण्यातही वापरत असल्याचा आरोप होवू लागल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानंतर या कटाचे मुख्य सुत्रधार वाझेच असल्याचा आरोप केला. सध्या वाझे यांना एनआयएने अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे."
"ती" पांढरी इनोव्हा कार पोलिसांचीच?